आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नियमांकडे दुर्लक्ष करून उद्धव ठाकरे आणि इतर मंत्र्यांनी घेतली शपथ, राज्यपालांनी वर्तवली नाराजी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्र्यांनी गुरुवारी घेतलेल्या शपथविधीच्या पद्धतीवर राज्याच्या राज्यपालांनी नाराजी वर्तवली आहे. नियम आणि कार्यपद्धतीचे उल्लंघन करत आमदारांनी राज्यपालांकडून शपथ सुरु करण्यापूर्वी आपआपले नेते आणि देवांचे नाव घेतले होते. कोणी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले तर कोणी बाळासाहेब ठाकरे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि शरद पवार यांचे स्मरण केले. सुत्रांनुसार, पुढील कोणत्याही कार्यक्रमात तसे न करण्याच्या राज्यपालांनी सूचना दिल्या.


कोणी कोणाचे स्मरण करत घेतली श
पथ

  • उद्धव ठाकरे: शपथ घेण्यापूर्वी म्हणाले - छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आणि आईवडिलांचे स्मरण करत शपथ घेतो की,...
  • एकनाथ शिंदे : मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून, धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मरण करून, आई- वडिलांच्या पुण्याईने, मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने ईश्वरसाक्ष शपथ घेतो…
  • नितीन राऊत : मी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम वंदन करतो. आदरणीय सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या आशीर्वादाने आणि तथागत भगवान बुद्धसाक्ष शपथ घेतो की…
  • जयंत पाटील : आदरणीय शरद पवार यांना वंदन करून ईश्वर साक्ष शपथ घेतो की...
  • छगन भुजबळ : 'जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर सावित्रीमाता फुले यांना वंदन करतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला वंदन करतो. आदरणीय शरद पवार यांच्या आदेशानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सामील होण्यासाठी शपथ घेतो. मी गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की…
  • सुभाष देसाई : छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून ईश्वरसाक्ष शपथ घेतो की...
  • बाळासाहेब थोरात : आदरणीय सोनिया गांधी यांच्या आशीर्वादाने, ईश्वरसाक्ष शपथ घेतो...

शपथ घेताना राज्यपाल मी...शब्दाने करतात सुरुवात 


शपथ घेताना राज्यपाल मी...शब्दाने सुरुवात करतात. यानंतर मुख्यमंत्री/मंत्री आपले नाव घेऊन शपथ घेतात. सुरुवातीला पदाची शपथ दिली जाते. त्यानंतर गोपनीयतेची शपथ दिली जाते. दोन्हीवेळा राज्यपाल मी शब्दाने सुरुवात करतात. बहुतेक नवनियुक्त मंत्र्यांनी राज्यपालांच्या वतीने शपथविधी सुरू करताना त्यांना मध्येच थांबवले. राज्यपालांना बोलणे थांबवत मंत्र्यांनी आपल्या लोकांचे स्मरण केले आणि शपथविधी प्रक्रिया पूर्ण केली.  

बातम्या आणखी आहेत...