Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | maharashtra govt starts model colleges in kokan

कोकणात उभारणार तीन मॉडेल महाविद्यालये

divya marathi team | Update - May 20, 2011, 03:59 PM IST

कोकणात तीन मॉडेल महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत.

  • maharashtra govt starts model colleges in kokan

    रत्नागिरी - भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्याच्या उच्च शिक्षणासंदर्भात विविध योजना आखण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत कोकणात तीन मॉडेल महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत.

    राज्यभरात अशी एकूण सात महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत. कोकणात उभारण्यात येणाऱ्या तीन मॉडेल महाविदयालयांपैकी दोन महाविद्यालये मुंबई विद्यापीठाअंतर्गत असणार आहेत. उच्च शिक्षणाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून 'मॉडेल महाविद्यालये' उभारणार आहे. महाविद्यालये रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील म्हापण येथे आणि रायगड जिल्ह्यात उभारण्यात येणार आहेत. या महाविद्यालयांच्या उभारणीसाठी आठ कोटींचा निधी उपलब्ध होणार असून, त्यातील एक तृतीयांश निधी विद्यापीठ अनुदान आयोग तर दोन तृतीयांश निधी राज्य सरकार देणार आहे.

    केंदातील विद्यापीठ अनुदान आयोगाने मांडलेल्या या संकल्पनेच्या माध्यमातून या महाविद्यालयांना जागा राज्य सरकार उपलब्ध करुन देणार आहे.Trending