आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Maharashtra Has 12 Coronary Patients; Health Minister Rajesh Tope Says 'all Patients Are Getting Well, Proper Treatments Are Going Well '

महाराष्ट्रात कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या 12 वर; 'सर्व रुग्णांची तब्येत ठीक, योग्य उपचार सुरू'- आरोग्यमंत्री राजेश टोपे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्यात 9 मुंबईत, 2 आणि नागपूरात 1 रुग्णाला कोरोनाची लागण

मुंबई- देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यातच आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 12 वर पोहचली आहे. यात पुण्यात 9, मुंबईत 2 आणि नागपुरात 1 रुग्ण आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच, या सर्वांची प्रकृती ठीक असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचेही ते म्हणाले.


माध्यमांना बोलताना राजेश टोपे म्हणाले की, राज्यातील रुग्णांना झालेली कोरोनाची लागण ही प्राथमिक स्थरावर आहे. सध्या खूप काळजी करण्यासारखे काही नाही. परंतू, ते पॉझिटिव्ह आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आहे, लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकारकडून अत्यंत प्रभावीपणे त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जाहिरातींच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती करण्यात येत असल्याची ही माहिती त्यांनी यावेळी दिली.


दरम्यान, 12 पैकी 10 रुग्ण हे एका टूर कंपनीद्वारे परदेशात गेले होते, त्यामुळे टूर कंपन्यांना पुढील टूर रद्द करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी या महिन्यात सुरू होणाऱ्या आयपीएल सामन्यांवरही भाष्य केले. ते म्हणाले की, सध्या राज्यात गर्दी जमेल अशा मोठ्या कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. बैठकीत आमचे आयपीएलवरही बोलणे झाले. यासाठी आम्ही दोन पर्याय काढले आहेत. एकतर आयपीएल सामने दर्शकांशिवाय होतील किंवा आयपीएल टुर्नामेंट पुढे ढकलावे लागेल.

राज्यातील सर्व राजकीय आणि शासकीय कार्यक्रमांवर बंदी


यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजेश टोपे यांनी कोरोनावरील राज्यव्यापी बैठक घेत आढावा घेतला. यात महाराष्ट्रातील सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच, आगामी काही काळासाठी राज्यात कोणतीही राजकीय सभा, शासकीय कार्यक्रम किंवा इतर स्वरुपाचा सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 


टोपे म्हणाले की, "चीनमधील वुहानमध्ये आता रुग्ण वाढत नाही, त्यांनी वुहानमधील सार्वजनिकपणे एकत्र येण्यावर निर्बंध लावले. लोकांना विलगीकरण करुन ठेवण्यात आले, यामुळे कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. म्हणूनच आम्ही देखील महाराष्ट्रात सार्वजनिक कार्यक्रम रोखण्याचे आदेश दिले आहेत. शाळांमधील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, तर त्यावरही लक्ष आहे. आवश्यकता पडल्यास शाळांनाही सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात येईल."