आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राला दोन सुवर्ण, मातीच्या ट्रॅकवर अहाेरात्र मेहनत; सिंथेटिक ट्रॅकवरच्या अव्वल धावपटूंना पिछाडीवर टाकत नाेंदवला ‘मीट’चा नवा विक्रम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकनाथ पाठक| औरंगाबाद

कितीही खडतर वाट असली तरी निश्चित केलेले ध्येय गाठण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी इच्छाशक्ती आणि प्रचंड मेहनतीची गरज असते, याचाच प्रत्यय आैरंगाबादच्या राष्ट्रीय विक्रमवीर धावपटू तेजस शिर्सेने आणून दिला. त्याने राष्ट्रीय स्पर्धेसाठीच्या काेणत्याही प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा नसतानाही फक्त तंत्रशुद्ध प्रशिक्षणाच्या बळावर विक्रमाचा पल्ला गाठला. यासाठी त्याला मातीच्या ट्रॅकवरील अहाेरात्र केलेली मेहनत अधिक महत्त्वाची ठरली आहे. 

औरंगाबादचा १८ वर्षीय युवा धावपटू तेजस शिर्से हा विजयवाडा येथील ३५ व्या ज्युनियर राष्ट्रीय अॅथलेटिक स्पर्धेत चॅम्पियन ठरला. त्याने पुरुषांच्या १८ वर्षांखालील ११० मीटरच्या अडथळा शर्यतीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने १३.५९ सेकंदांमध्ये निश्चित अंतर गाठून अव्वलस्थानी धडक मारली. त्याने फेडरेशनच्या स्पर्धेत यंदा पदार्पण केले. याच संधीचे साेने करताना त्याने पहिल्याच सहभागामध्ये साेनेरी यशाचा पल्ला गाठला. तेजसने गतवर्षी १७ वर्षांखालील युवांच्या स्पर्धेत याच इव्हेंटमध्ये राष्ट्रीय विक्रमाची नाेंद केली हाेती. 

साक्षीने रिलेत पटकावले गाेल्ड मेडल; स्पर्धेत पदकाचा डबल धमाका हुकला
विजयवाडा  येथे फेडरेशनच्या वतीने आयाेजित ३५ व्या ज्युनियर राष्ट्रीय अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये साक्षी चव्हाणने सहभाग घेतला. तिने महिलांच्या १०० मीटर गटामध्ये आपले काैशल्य पणास लावले. मात्र, या १६ वर्षांखालील महिला गटात धावपटूचा पदकाचा प्रयत्न अपुरा ठरला. मात्र, पदकाची हीच कसर तिने मिडले रिलेमध्ये भरून काढली. तिने आपल्या सहकारी दिया सुमेरपूर, सानिया सावंत आणि रिया पाटीलसाेबत सुवर्णपदकाची कमाई केली. तिने मुख्य फेरीपर्यंत अव्वल कामगिरी केली. त्यामुळे तिला मुख्य फेरी गाठता आली. मात्र, यात तिला आपली लय कायम ठेवता आली नाही. तिने  निश्चित अंतर पूर्ण केले. त्यामुळे ती या गटात सातव्या स्थानावर राहिली.

दुसऱ्या हडर्ल्सपासून आघाडी; वचपा काढण्याची जिद्द सरस

गतवेळच्या खेलाे इंडिया स्पर्धेतील राैप्यपदक विजेत्या तेजस शिर्सेला पात्रता फेरीतील अव्वल कामगिरीमुळे तिसऱ्या लेनवरून सुरुवात करण्याची संधी मिळाली. ही लेन पदकाचा प्रबळ दावेदार असलेल्या धावपटूला दिली जाते. त्यामुळे त्याला अव्वल स्थान गाठण्याचे बळ आपाेआप मिळाले. त्याने या लेनवरून चांगली स्टार्ट केली. त्याने दुसऱ्या हर्डल्सपासून आघाडी घेतली आणि हीच लय कायम ठेवताना अव्वल स्थान गाठले. यादरम्यान त्याने खेलाे इंडियातील स्पर्धेत मिळालेल्या पराभवाची परतफेड दिल्लीच्या चॅम्पियन रितेशला करायची हाेती. याच ऊर्मीने त्याने आपली लय कायम ठेवताना बाजी मारली. त्यामुळे खेलाे इंडियाचा चॅम्पियन धावपटू रितेश हा दुसऱ्या स्थानावर राहिला. त्याने १३.७३ सेकंदांत हे अंतर पूर्ण केले. यात त्याला तेजसविरुद्धचे आपले वर्चस्व अबाधित ठेवता आले नाही. याशिवाय त्याला वडिलांच्या उपस्थितीनेही पदक जिंकण्यासाठीचे बळ मिळाले. वडील अशाेक शिर्से हे पहिल्यांदाच मुलाची राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी पाहण्याठी विजयवाडा येथे आले हाेते. त्यामुळे साेनेरी यशाचा पल्ला गाठून त्याने वडिलांना सुवर्णपदकाची भेट दिली. त्यामुळे त्याला वडिलांचेही स्वप्न पूर्ण करता आले. यासाठी त्याला घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. मुलाची राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी पाहण्याठी विजयवाडा येथे आले हाेते. त्यामुळे साेनेरी यशाचा पल्ला गाठून त्याने वडिलांना  सुवर्णपदकाची भेट दिली.  त्यामुळे त्याला वडिलांचेही स्वप्न पुर्ण करता आले. 
- सुरेंद्र माेदी, काेच, तेजस शिर्से.