आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी आपले रक्त सांडून आजच्या दिवशी स्वतंत्र केला होता महाराष्ट्र!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी 106 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. आज (21 नोव्हेंबर) या हुतात्म्यांना वंदन करण्याचा दिवस.. त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्‍याचा दिवस...

 

21 नोव्हेंबर 1956 रोजी 106 हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळे तत्कालीन सरकारला संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीपुढे झुकावे लागले होते. या हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानानंतर सरकारला अखेर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली. यानिमित्ताने जाणून घेऊया महाराष्ट्राचा इतिहास...

 

सरकारचा निषेध करण्यासाठी निघाला विशाल मोर्चा

> 21 नोव्हेंबर 1956 ला फ्लोरा फाऊंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते. या निर्णयामुळे मराठी माणूस पेटून उठला होता. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून सरकारच्या निर्णयाचा निषेध केला जात होता. कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकाकडे कूच करत होता.

 

अखेर नमले सरकार आणि स्वतंत्र झाला महाराष्ट्र

> प्रचंड जनसमुदाय एका बाजुने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजुने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत फ्लोरा फाऊंटनकडे निघाला होता. या मोर्चाला उधळून लावण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. मात्र, अढळ सत्याग्रहींपुढे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना गोळीबाराचे आदेश दिले. या गोळीबारात तीनशेहून अधिक आंदोलक जखमी झाले. 106 जणांनी आपला प्राण गमवला. त्यानंतर या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेत 1 मे, 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर 1965 मध्ये फ्लोरा फाऊंटन येथे हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा- मुंबईसह संयुक्त महाराष्‍ट्रासाठी या 106 जणांनी दिले होते बलिदान..

बातम्या आणखी आहेत...