सीमा प्रश्नासाठी 1 जूनच्या आंदोलनास सज्ज
divya marathi team | Update - May 28, 2011, 04:20 PM IST
सावंतवाडी - महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्ना संदर्भात महाराष्ट एकीकरण समितीच्या वतीने 1 जूनला येथे होणाऱ्या जेलभरो आंदोलनात सर्वपक्षीय दोन हजार कार्यकर्ते सहभागी होतील.
-
सावंतवाडी - महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्ना संदर्भात महाराष्ट एकीकरण समितीच्या वतीने 1 जूनला येथे होणाऱ्या जेलभरो आंदोलनात सर्वपक्षीय दोन हजार कार्यकर्ते सहभागी होतील. असा दावा महाराष्ट्र एकीकरण समितीचे जिल्हाध्यक्ष वसंत ऊर्फ अण्णा केसरकर यांनी केला.
सीमा प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दावा सुरू आहे. त्याचा निकाल लागेपर्यंत सीमा भाग केंद्र शासित करावा, अशी एकीकरण समितीची मागणी आहे. यासंदर्भात एकीकरण समितीचा निकराचा संघर्ष सुरू आहे. 1 जूनचे जेलभरो आंदोलन याच संघर्षाचा भाग असल्याचे श्री. केसरकर यांनी सांगितले.