आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - जागतिक घडामाेडींच्या पार्श्वभूमीवर भांडवली बाजारात अनिश्चिततेचे वातावरण असले तरी प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) बाजारपेठेत नव्याने समभाग करणाऱ्या राज्यातील लघु आणि मध्यम उद्याेगातील कंपन्यांना गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या एसएमई मंचावर राज्यातील तब्बल १३२ लघु आणि मध्यम उद्याेगातील कंपन्यांनी समभाग विक्रीतून १७८० काेटी रुपयांचा निधी उभारून अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राने सर्वाधिक निधी उभारणीची नाेंद केली आहे. एसएमई कंपन्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता राेजगार निर्मिती अाणि निर्यातीत सिंहाचा वाटा उचलणारे हे क्षेत्र मंदीतून सावरत असल्याचे ताज्या आकडेवारीवरून अधाेरेखित हाेत आहे.
लघु आणि मध्यम उद्याेगातील कंपन्यांना भांडवल उभारणी करून व्यवसायाचा विस्तार करता यावा, यासाठी मुंबई शेअर बाजारात १३ मार्च २०१२ राेजी या कंपन्यांसाठी “बीएसई एसएमई’ मंच स्थापन झाला. ६ वर्षांत एकूण ४७४ कंपन्यांनी बाजारात नाेंदणी केली असून त्यात राज्यातील १३२ कंपन्या आहेत. या कंपन्यांनी प्राथमिक समभाग विक्रीच्या माध्यमातूून आतापर्यंत १७८० काेटींचा निधी उभारला. नुकत्याच संपलेल्या वर्षात एसएमई स्टाॅक एक्स्चेंजवर महाराष्ट्रातील ३८ कंपन्यांनी नाेंदणी करून सर्वाधिक ७८५ काेटींचा निधी उभारला. एसएमई शेअर बाजाराचे प्रमुख अजय ठाकूर म्हणाले, एसएमई मंचावर समभाग नाेंदणी केल्यानंतर लहान कंपन्यांचे हाेणारे ब्रॅंडिंग आणि वृद्धीबाबत लघु उद्याेजकांत २ वर्षांपासून जास्त जागरूकता आली. त्यामुळेच एसएमई मंचावर नाेंदणी करणाऱ्या कंपन्यांची संख्या सातत्याने वाढत असून निधी उभारणी जास्त हाेण्यास मदत झाली आहे.
उद्याेगांचा विकास झाला तर राेजगार निर्मिती वाढून आर्थिक विकासाला मदत हाेणार आहे. नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांनी एसएमई क्षेत्राच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य देण्याचे अाश्वासन दिले असून त्याचाही सकारात्मक परिणाम लघु उद्याेजकांवर हाेत आहे. एसएमई मंचावर आधी नाेंदणी झाल्यानंतर कंपन्यांनी केलेल्या प्रगतीचा मागाेवा घेऊन आता अन्य लघु उद्याेजक, कंपन्यांत विश्वास निर्माण होत असल्यानेही भांडवल उभारणी सर्वाधिक हाेऊ शकली, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.
या लघु आणि मध्यम कंपन्यांच्या समभाग विक्रीचे व्यवस्थापन करणाऱ्या पँटामाेथ कॅपिटलचे अध्यक्ष महावीर लुणावत म्हणाले, उद्याेग विभागातर्फे नागपूर, औरंगाबाद, पुणे व अन्य शहरात गुंतवणूकदार जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.