आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MH Live: औरंगाबादेत इम्तियाज जलील यांचा विजय, अधिकृत घोषणा बाकी; राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई / औरंगाबाद - देशभरात 7 टप्प्यांमध्ये झालेल्या 17 व्या लोकसभेच्या मतदानाची मोजणी सुरू आहे. यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 48 पैकी 23 जागा जिंकल्या होत्या.2014 मध्ये आलेली मोदी लाट 2019 मध्ये सुद्धा कायम असल्याचे प्राथमिक निकालांतून स्पष्ट होत आहे. भाजप आणि शिवसेना युतीला मिळणाऱ्या जागा पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. तर भाजप अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप मुख्यालय गाठले. यावेळी सर्वच भाजप नेत्यांचे जंगी स्वागत करून विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे, 2014 मध्ये मोदींची लाट होती असे म्हटले गेले. यंदा मोदींची त्सुनामी आली आहे.

 

अशोक राव चव्हाण यांचाही पराभव

2014 मध्ये मोदी लाटेत जेव्हा काँग्रेसला एकही जागा मिळणे शक्य नव्हते, तेव्हा अशोकराव चव्हाण यांनी स्वतःसह हिंगोलीतील जागा सुद्धा काँग्रेसला मिळवून दिली होती. त्यांच्यामुळेच काँग्रेसचे राज्यात दोन खासदार होते. परंतु, या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांचा पराभव केला. हा काँग्रेससाठी सर्वात मोठा झटका मानला जात आहे.


Maharashtra Live

- औरंगाबादेत काट्याची टक्कर! चंद्रकांत खैरे पिछाडीवरच, इम्तियाज जलील यांची विजयाकडे वाटचाल

- औरंगाबादेत आकड्यांचा लपंडाव सुरूच; इम्तियाज जलील मागे, खैरे 4 हजार मतांनी पुढे

- हिंगोलीत शिवसेनेचे हेमंत पाटील, उस्मानाबादेत ओमराजे निंबाळकर विजयी

- 16 व्या फेरी अखेर जलील यांना 2,70,239 मते तर चंद्रकांत खैरेंना 2,40,390 मते; जलील यांना 29,849 मताधिक्य

- धुळेः डॉ. सुभाष भामरे यांना 2 लाख 29 हजार 858 पेक्षा जास्त मताधिक्य

- हिंगोलीत हेमंत पाटील 1 लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने पुढे

- नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचा 50 हजार मतांनी पराभव, भाजपचे चिखलीकर विजयी

- नांदेडमध्ये काँग्रेसला वंचित आघाडीचा फटका, काँग्रेस पराभूत

- औरंगाबादः इम्तियाज जलील यांची 20,490 मताधिक्याने आघाडी

- अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा पराभव

- शिरुरमध्ये अमोल कोल्हेंचा विजय, शिवसेनेचा मोठ्या फरकाने पराभव

- औरंगाबादेत इम्तियाज जलील यांची आघाडी कायम, खैरे दुसऱ्या क्रमांकावर; जलील यांना 182747 तर खैरेंना 151150 मते

- जालन्यातून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे विजयाच्या दिशेने

- पवार घराण्याची तिसरी पिढी पराभूत, पार्थ पवार यांचा मावळ येथून पराभव

- बारामती येथून सुप्रिया सुळे विजयी घोषित, भाजपच्या कांचन कुल यांचा 1.5 लाखांहून अधिक मतांनी पराभव

- हिंगोलीः शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील 68 हजार मतांनी पुढे, काँग्रेसचे सुभाष वानखेडे दुसऱ्या क्रमांकावर

- बारामतीः 16 व्या फेरीनंतर सुप्रिया सुळे लाख मतांनी आघाडीवर, सुळेंना 4,88,193 तर कांचन कुल यांना 3,80,785 मते

- जालनाः भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सातव्या फेरीअखेर 1 लाख 7 हजार मतांनी आघाडीवर

- नंदुरबारः भाजपच्या डॉ. हिना गावित यांची 79 हजार मताधिक्याने आघाडी

- हिंगोलीत शिवसेनेची आघाडी; सुभाष वानखेडे- 47220, हेमंत पाटील- 118371 तर मोहन राठोड यांना 35459 मते

- मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेली गोव्यातील पणजी सीटवरून काँग्रेस उमेदवार अतानासियो मोन्सेरात 1775 मतांनी विजयी

- औरंगाबादः खैरे दुसऱ्या क्रमांकावर; इम्तियाज जलील यांना 151290, खैरेंना 118373 तर जाधव यांना 111803 मते

- जालनाः रावसाहेब दानवेंची आघाडी; दानवे 122588, तर औताडेंना 53292 मते

- उस्मानाबादः सातव्या फेरीअखेर शिवसेनेचे उमेदवार ओमराजे 38 हजार 158 मतांनी आघाडीवर
- हिंगोलीः शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील 41 हजार मतांनी आघाडीवर

- औरंगाबादः सहाव्या फेरीअखेर चंद्रकांत खैरे- 80981, इम्तियाज जलील- 96759, हर्षवर्धन जाधव- 85344; जलील यांची 11415 मतांची आघाडी

- मावळः राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार 1.5 लाख मतांनी पिछाडीवर

- अकोला: सहाव्या फेरी अखेर भाजप- 102285, वंचित-61412 आणि काँग्रेस- 45770

- धुळे सहावी फेरी भाजपचे डॉ. सुभाष भामरे 95927 मतांनी आघाडीवर...

- माढाः चौथ्या फेरीअखेर रणजित निंबाळकर-109213, संजय शिंदे- 105878,  विजय मोरे- 10760
- लातूरः सुधाकर शृंगारे (भाजप)- 71818; मच्छिंद्र कामत (काँग्रेस)- 31252; राम गारकर (वंचित आघाडी)- 11765

- औरंगाबादः चौथ्या फेरीच्या मतमोजणीनंतर खैरे मतमोजणीवर केंद्रावर

- औरंगाबादः हर्षवर्धन जाधव- 53,855; इम्तियाज जलील- 50,656 तर खैरेंना 46,344 मते

- जालनाः दुसऱ्या फेरी अखेर रावसाहेब दानवे यांना 38 हजार मतांची आघाडी

- बारामतीत सुप्रिया सुळे यांची 29913 मतांनी आघाडी, नवव्या फेरीनंतर 1,96,430 मते

- मावळः पार्थ पवार- 145140, श्रीरंग बारणे- 202363, बारणे आघाडी - 60223

- शिरूरः अमोल कोल्हे- 1,15,881; आढळराव पाटील- 98751
- पुणेः गिरीश बापट- 30,682, मोहन जोशी- 14,456; बापट 16,226 मतांनी पुढे

- बारामतीत कांचन कुल यांना 14,5502 तर सुप्रिया सुळेंना 15, 9962 मते; सुळेंची 14460 मतांनी आघाडी

- बारामतीत सुप्रिया सुळे 25 हजार मतांनी आघाडीवर
- शिरुरमध्ये राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे 20 हजार मतांनी पुढे

- अमरावतीमध्ये तिसऱ्या फेरीनंतर आनंदराव अडसूड यांना 67340 आणि नवनीत कौर राणा यांना 63109 मते, गुणवंत देवपारेंना फक्त 9341 मते

- चंद्रपूर: भाजपचे हंसराज अहिर यांना 16225 मते, तर बाळू धानोरकर यांना 16176 मते
- रावेरमध्ये पहिल्या फेरीत रक्षा खडसे यांची 14 हजार मतांनी आघाडी

- अमरावती तिसरी फेरी- आनंदराव अडसूळ- 67,340; नवनीत कौर राणा- 63,108

- उस्मानाबादमध्ये तिसऱ्या फेरीनंतर शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर 14 हजार मतांनी आघाडीवर

- औरंगाबादेत दुसऱ्या फेरीनंतर खैरे: 23565, झांम्बड: 6404, जलील: 36152, जाधव: 27915, जलील यांची 8237 मतांनी आघाडी

- गिरीश बापट 27330, मोहन जोशी 11601, गिरीश बापट यांची 15729 मतांनी आघाडी

- 8237 मतांनी इम्तियाज जलील दुसऱ्या फेरीत आघाडीवर

- नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण 9 हजार मतांनी मागे

- धुळे येथून सुभाष भामरे यांची आघाडी

- अकोल्यात प्रकाश आंबेडकर आघाडीवर... औरंगाबादेतून इम्तियाज जलील यांची अजुनही आघाडी

- रावेरमधून रक्षा खडसे यांची आघाडी, सांगलीतून विशाल पाटील पिछाडीवर

- उस्मानाबादेत ओमराजे निंबाळकर आघाडीवर

- परभणीत सेनेचे संजय जाधव यांची आघाडी

- सोलापूरमध्ये सुशील कुमार शिंदे पुन्हा आघाडीवर

- बारामतीत पुन्हा सुप्रिया सुळे यांची आघाडी, 4 हजार मतांनी पुढे

- बारामतीत कांचन कुल यांची 5 हजार मतांनी आघाडी

- पुण्यातून गिरीश  बापट यांची आघाडी, नाशिकमधून गोडसे पिछाडीवर

- बीडमधून भाजपच्या प्रीतम मुंडे आघाडीवर, सांगलीतून विशाल पाटील यांची आघाडी

- इम्तियाज जलील 18 हजार मतांसह पहिल्या, तर हर्षवर्धन जाधव दुसऱ्या क्रमांकावर

- शिवसेनेचे चंद्रकांत खैरे चक्क तिसऱ्या क्रमांकावर घसरले

- दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा पिछाडीवर

- सुप्रिया सुळे 8 मतांनी मागे तर पार्थ पवार 9 हजार मतांनी पिछाडीवर

- नागपूर येथून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आघाडीवर

- जालन्यातून रावसाहेब दानवे आणि परभणीतून शिवसेनेची आघाडी

- शिरुर येथून अमोल कोल्हे यांची 7 हजार मतांची आघाडी

- सोलापुरात भाजपची आघाडी, काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे मागे

- बारामती येथून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे मागे

- पुण्यात काँग्रेसच्या आक्षेपानंतर एका मतमोजणी केंद्रावर काउंटिंग थांबवली

- काँग्रेसचा बालेकिल्ला नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण पिछाडीवर
- औरंगाबादेत शिवसेनेला झटका, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचे इमतियाज जलील पुढे