आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्राने एका वर्षात 20 वाघ गमावले; वन विभागाचे दावे फाेल, 'वाघ वाचवा' मोहीम फसली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील पवनी वनक्षेत्रात सलग दाेन दिवसांत दाेन वाघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटनेने पशुप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त हाेत आहे. २०१८ या सरलेल्या वर्षात एकट्या महाराष्ट्रात तब्बल २० वाघ मारले गेले. त्यापैकी यवतमाळ जिल्ह्यातील कथित नरभक्षक अवनी वाघिणीच्या शिकारीचे प्रकरण तर देशभर गाजले. राज्यात वाघांची संख्या वाढल्याचे कागदोपत्री दावे वन विभागाकडून होत असले तरी वाघांचे संवर्धन करण्याची मोहीम सपशेल अपयशी ठरली असल्याचेच दिसून येते. 

 

राज्यात दोनशेपेक्षा अधिक वाघ असल्याचे दावे वन विभागाकडून होत आहेत. ताज्या गणनेची आकडेवारी अद्याप वन विभागाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी सातत्याने वाढत आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी वनक्षेत्रात रविवार आणि सोमवारी दोन वाघांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. या दोन्ही घटनांमध्ये वाघांना शिकारीवर कीटकनाशक टाकून ठार मारल्याचा अंदाज आहे. वाघांना विष देऊन ठार मारण्याची वर्षभरातील पाचवी घटना आहे. शेतांमध्ये विजेच्या तारा टाकल्याने त्यात पाय अडकून वाघ मृत्युमुखी पडल्याच्या घटनाही विदर्भात घडलेल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोनो जंगल परिसरात बल्लारपूर-गोंदिया पॅसेंजरखाली येऊन रेल्वेखाली येऊन तीन बछड्यांचा मृत्यू मागील महिन्यात झाला हाेता. विष घालून वाघांना ठार मारण्याचे प्रकार लक्षात घेऊन वन विभागाने मागील वर्षी वनक्षेत्रांना लागून असलेल्या शेतीच्या क्षेत्रांचे सर्वेक्षण केले. येथील लाेकांमध्ये जनजागृतीही केली मात्र त्याचा फारचा उपयाेग झालेला नाही. 

 

जनजागृतीचे प्रयत्न 
वाघांना ठार मारण्याच्या घटना होऊ नयेत, यासाठी वन विभागाकडून लोकांमध्ये जागृतीचे प्रयत्न सातत्याने सुरूच आहेत. त्यात कुठेही खंड पडलेला नाही. भंडारा जिल्ह्यातील दोन्ही घटना अत्यंत दुर्दैवी आहेत.' - ए.के. मिश्रा, प्रधान मुख्य वन संरक्षक