मान्सून / महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरातेत 23% अधिक पाऊस, 12 राज्यांत आणखी पावसाचा इशारा

देशात सरासरीपेक्षा 4% अधिक पाऊस, मान्सून अजूनही सक्रिय

Sep 16,2019 07:50:00 AM IST

नवी दिल्ली - सप्टेंबर निम्मा सरला तरी देशात मान्सून परतीच्या प्रवासावर नाही. अजून तसे संकेतही नाहीत. गेल्या वर्षी १५ सप्टेंबरला मान्सून परतला होता. मात्र, या वर्षी अजूनही जोरदार पाऊस सुरू आहे. देशात आतापर्यंत सरासरीपेक्षा ४% अधिक पाऊस झाला आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये २३% अधिक पाऊस झाला. दरम्यान महाराष्ट्र वगळता राजस्थान, गुजरातसह १२ राज्यांत दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.


चित्तोडगड : ३५० मुले, ५० कर्मचारी दोन दिवसांपासून शाळेत अडकले
चित्तोडगड। राजस्थानच्या चित्तोडगडमध्ये मुसळधार पावसात राणा प्रताप धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने नद्यांना पूर आला आहे. यामुळे एका सरकारी शाळेत शनिवारपासून ३५० मुले आणि ५० शिक्षक अडकले आहेत. मुले, शिक्षकांना स्थानिक लोक जेवण पुरवत आहेत. पाणी ओसरल्यावर मुलांना घरी पाठवले जाईल.


राजस्थानच्या कोटा शहरात अनेक ठिकाणी ८ फुटांपर्यंत पाणी साचले. कॉन्स्टेबल राकेश मीणा रविवारी सकाळी ड्यूटीवर जात होते. त्यादरम्यान त्यांनी दोन मुले अडकलेली पाहिली. त्यांनी एक ट्यूब घेऊन पाण्यात उडी मारली आणि काही अवधीत मुलांना वाचवले.


देशात ७५% भागांत सरासरीहून अधिक पाऊस
दक्षिणेतील राज्यांत सरासरीहून १०% अधिक पाऊस झाला.
पूर्व व उत्तर भारतात सरासरीहून १८% कमी पाऊस झाला.
देशातील ९७% जलाशये तुडुंब, धरणांतून प्रचंड प्रमाणात विसर्ग.

X