आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोहिनूर प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ED कडून नोटीस, 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 'ईडी' कडून नोटीस जारी करण्यात आली आहे. कोहिनूर मिल प्रकरणातून ईडीने ही नोटीस राज यांना पाठवली असून येत्या 22 ऑगस्टला राज ठाकरेंना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. परंतू, या संदर्भात मनसेकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाहीये.

राज्यातील विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असतानाच राज ठाकरेंना ईडीकडून नोटीस धाडण्यात आली आहे. कोहिनूर मिलच्या या जागेप्रकरणी आता माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशी यांनाही ईडीकडून नोटीस बजावली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...