आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोक आमच्याकडून कामाची अपेक्षा करतात पण मतदान करत नाहीत, याला काय अर्थ ? पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली खंत

2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
मेळाव्यात राज ठाकरेंना कार्यकर्त्यांनी तलवार भेट दिली. - Divya Marathi
मेळाव्यात राज ठाकरेंना कार्यकर्त्यांनी तलवार भेट दिली.
 • सरकावर अंकूश ठेवण्यासाठी शॅडो कबिनेटची घोषणा- राज ठाकरे

मुंबई - गेल्या १४ वर्षांत आपण अनेक कामे केली, तरीही मतदानाच्या वेळेस लोक कुठे जातात हे काही कळत नाही़. लोकांना कामाच्या अपेक्षा आमच्याकडून आहेत, पण मतदान आम्हाला नाही करणार याला काय अर्थ आहे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली. नवी मुंबईत विष्णुदास भावे नाट्यगृहात मनसेचा १४ वा वर्धापन दिन पार पडला. या वेळी राज बोलत होते.राज म्हणाले, १४ वर्षे झाली, प्रवास सुरू आहे. यात माध्यमांनी प्रेम दिले, बोचरी टीका केली. पण हे चालायचेच. काँग्रेसची केंद्रात सत्ता होती. आज काँग्रेसचा दिल्लीत एकही आमदार निवडून नाही आला. असे प्रकार होत असतात. जेव्हा देशात लाट असते तेव्हा अनेक पक्षांना पराभव स्वीकारावा लागतो. तरी पण मलाच विचारतात की तुमचा पराभव का झाला? इतक्या चढउतारानंतरही तुम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक माझ्यासोबत राहिलात याचा मला आनंद आहे. प्रतिरूप मंत्रिमंडळाच्या बाबतीत पक्षाचे पदाधिकारी नसलात, पण तुम्हाला एखाद्या विषयात काम करायची इच्छा असेल तर त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा. मी तुम्हाला या कामात सहभागी करून घेईन, असे राज म्हणाले.
 

ब्लॅकमेल करणारे आरटीआय नको
 
> महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसाठी काम करणारी ही खाती आहेत. 
> सरकारचे वाभाडे जिथे काढायचे आहेत, तिथे वाभाडे काढा आणि जिथे सरकार चांगले काम करेल तिथे अभिनंदन पण करा.
> हे पैसे मिळवण्याचे काम नाही, ब्लॅकमेल करणारे आरटीआय टाकायचे नाहीत. 
>  परस्पर पत्रकार परिषदा घ्यायच्या नाहीत, विचारल्याशिवाय पुढील निर्णय घ्यायचे नाहीत.आदित्य-अमित यांचा रंगणार सामना

मेळाव्यात बहुप्रतीक्षित शॅडो कॅबिनेट अर्थात प्रतिरूप मंत्रिमंडळाची घोषणा करण्यात आली. मनसे नेते अमित ठाकरे यांना काका उद्धव ठाकरे आणि चुलत भाऊ आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या खात्यांच्या कारभारावर नजर ठेवण्याची जबाबदारी मिळाली आहे.  याशिवाय अमित केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य यांच्या खात्यांवरच नजर ठेवणार नाहीत, तर हसन मुश्रीफ, एकनाथ शिंदे, संजय राठोड यांच्याही खात्यांवर नजर ठेवतील.
 असे आहे मनसेचे जंबो शॅडो कॅबिनेट 

 • गृह विधी व न्याय, जलसंपदा आणि सामान्य विभाग – बाळा नांदगावकर, किशोर शिंदे, संजय नाईक, राजीव उंबरकर, प्रवीण कदम, योगेश खैरे, प्रसाद सरफरे, दीपक शर्मा,
 • जलसंपदा आणि लाभक्षेत्र – अनिल शिदोरे
 • मराठी भाषा – अमित ठाकरे, अनिल चौपडे
 • वित्त आणि गृहनिर्माण – नितीन सरदेसाई,
 • महसूल – अनिल अभ्यंकर, दिलीप कदम, संदीप पाचंगे,
 • ऊर्जा – शिरीष सावंत, मंदार हळबे, सागर देवरे, विनय भोईटे,
 • ग्रामविकास – जयप्रकाश बाविस्कर, अमित ठाकरे, अनिल शिदोरे, प्रकाश भोईर
 • वने, आपत्ती व्यवस्थापन – संजय चित्रे, अमित ठाकरे, संतोष धुरी, आदित्य दामले, वागीश सारस्वत, ललित यावलकर
 • शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, वैद्यकीय शिक्षण – अभिजित पानसे, आदित्य शिरोडकर – उच्च शिक्षण-सुधाकर तांबोळी, अमोल रोगे, अभिजित पानसे, चेतन पेडणेकर
 • कामगार – राजेंद्र वागस्कर, गजानन राणे, सुरेंद्र सुर्वे
 • नगरविकास आणि पर्यटन– संदीप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येरुणकर, कीर्ती शिंदे, हेमंत कदम, संदीप कुलकर्णी, फारुक डाळा, योगेश चिले,
 • सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण – रीटा गुप्ता, कुंदा राणे
 • सहकार आणि पणन – दिलीप धोत्रे, कौस्तुभ लिमये, वल्लभ चितळे
 • अन्न व नागरी पुरवठा – राजा चौगुले, विशाल पिंगळे, महेश जाधव
 • मत्स्यविकास आणि बंदरे – परशुराम उपरकर, निशांत गायकवाड
 • महिला व बालविकास – शालिनी ठाकरे
 • सार्वजनिक बांधकाम – सीमाताई शिवलकर, संजय शिरोडकर
 • रोजगार हमी आणि फलोत्पादन – बाळा शेडगे, आशिष पुरी
 • सांस्कृतिक कार्य – अमेय खोपकर
 • कृषी व दुग्धविकास – संजीव पाखरे, अजय कदम
 • कौशल्य विकास – स्नेहल जाधव
 • सामाजिक न्याय – संतोष सावंत, गजानन काळे
 • ग्राहक सरंक्षण – प्रमोद पाटील
 • आदिवासी विकास – आनंद एंबडवार, किशोर जाचक, परेश चौधरी
 • पर्यावरण – पाली पाटील, कीर्तिकुमार शिंदे, देवव्रत पाचिल
 • खारजमीन भूकंप पुनर्वसन – अमिता माझगावकर
 • क्रीडा व युवक कल्याण – विठ्ठल लोकणकर
 • अल्पसंख्याक – अल्ताफ खान, जावेद तडवी.
बातम्या आणखी आहेत...