आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमी सज्ज; राज्यभरातून भीमसैनिक रवाना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतरत्न डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या ६२व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्रासह देशभरातून दाेन दिवस अगाेदरच अांबेडकरी अनुयायी चैत्यभूमीवर दाखल हाेण्यास सुरुवात झाली अाहे. लाखाेंच्या संख्येने येणाऱ्या भीम अनुयायांची काेणत्याही प्रकारची गैरसाेय हाेऊ नये, यासाठी मुंबई महानगरपालिकेने सर्व मूलभूत सुविधा तैनात ठेवून सज्जता केली अाहे. अापत्कालीन परिस्थितीत तात्पुरता निवारा, पिण्याच्या पाण्याचे टँकर, फिरते शाैचालय अादी सुविधा उपलब्ध करून देण्याबराेबरच मुंबर्इ महानगरपालिकेचे अधिकारी जातीने देखरेख करीत अाहेत. 

 

डाॅ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (६ डिसेंबर) अभिवादन करण्यासाठी काेल्हापूर, नाशिक, अमरावती, लातूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिराेली, लातूर, उस्मानाबाद तसेच लखनऊ, उत्तर प्रदेशसारख्या भागातून अालेल्या अनुयायांनी चैत्यभूमी तसेच नजीकचा शिवाजी पार्कचा परिसर अातापासून गजबजू लागला अाहे. सुरक्षिततेसाठी संपूर्ण परिसरात पाेलिसांचा चाेख बंदाेबस्त ठेवण्यात अाला असून अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात ठेवण्यात अाल्या अाहेत. चैत्यभूमी प्रवेशद्वार तसेच शिवाजी पार्कच्या चारही बाजूंना रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात अाल्या अाहेत. यंदाच्या वर्षी शिवाजी पार्क मैदान चारही बाजूंनी पत्रे व कापड लावून बंद करण्यात अाले अाहे. 

 

माेबाइल चार्जिंग सुविधा 
शिवाजी पार्क येथे एक लाख चाैरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपात तात्पुरता निवारा उभारण्यात अाला अाहे. या शामियान्यामध्ये जवळपास ३०० माेबाइल चार्जिंग पाॅइंट बसवण्यात अाले अाहेत. तसेच अनुयायांसाठी इतर सुविधाही करण्यात आल्या आहेत. 

 

अाराेग्य तपासणीसाठी विशेष सुविधा 
महापरिनिर्वाण दिनासाठी येणारे अनुयायी माेफत अाराेग्य सेवांचा माेठ्या प्रमाणावर लाभ घेतात. त्यामुळे यंदाच्या वर्षी विविध प्रकारच्या तपासण्यांसाठी सहा स्वतंत्र कक्ष उभारण्यात अाले अाहेत. मधुमेह, एचअायव्हीची माेफत चाचणी करून दिली जाणार अाहे. त्याचप्रमाणे चैत्यभूमी व सूर्यवंशी हाॅल येथे विशेष बूथ उभारण्यात अाले अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...