आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शुक्रवारी महाराष्ट्रातील राजकीय नाट्य थांबले तेव्हा वाटले की आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येत सरकार बनवतील. मात्र, रात्रीतच सर्व समीकरणे बदलली. कसे ते वाचा-
शुक्रवारी रात्री अजितदादांचा भाजपला पाठिंबा, पहाटे राष्ट्रपती राजवट हटवली....
- शुक्रवारी सायं. ७.३० वा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत झाल्याचे सांगितले.
- अजित पवार शिवसेना नेत्यांसोबत बैठकीत बसले होते. मात्र, रात्री ९ वाजता निघून गेले आणि फोन बंद झाला.
- सायं. ८.३० वा : फडणवीस राजभवनावर पोहोचले. राष्ट्रवादीसोबत सरकारचा दावा केला. रात्री ११ वा. राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे पत्र राजभवनात पाेहोचले.
- रात्री ११.३० वा : फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली. रात्री १२ वाजता राजभवनातून राष्ट्रपती भवनावर अहवाल पाठवला. राष्ट्रपती भवनातून त्याची माहिती गृह मंत्रालयाला दिली.
- केंद्राने नियम १२ अंतर्गत कॅबिनेटच्या मंजुरीविना राष्ट्रपती राजवट हटवली. कॅबिनेटची मंजुरी नंतर मिळू शकते.
- शनिवारी सकाळी ५.३० वा : जाहीर करण्यात आली.
- सकाळी ६.३० वा : फडणवीस आणि अजित पवार त्यांचे १२ आमदार राजभवनावर पोहोचणे सुरू झाले.
- ७.५० वा : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पदांची शपथ घेतली.
शनिवारी सकाळी अजितदादा उपमुख्यमंत्री, समर्थक आमदार दिल्लीस रवाना....
- सकाळी ८.१६ वा : पीएम मोदींकडून फडणवीस, अजित पवारांचे अभिनंदन.
- सकाळी ८.२९ वा : सूत्रांची माहिती- अजितदादांसोबत राष्ट्रवादीचे २२ अामदार. काही शिवसेना नेते, आमदारही संपर्कात.
- सकाळी ८.४४ वा : सूत्रांची माहिती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकारच्या स्थापनेच्या चर्चेत सहभागी होते.
- सकाळी ८.४५ वा : काँग्रेसचा आरोप : राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला.
- ९.११ वा : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेही अजित पवारांसोबत.
- ९.१६ वा : प्रफुल्ल पटेल म्हणाले : शरद पवारांचे याच्याशी काही देणे-घेणे नाही.
- ९.२७ वा : शरद पवार म्हणाले : हा राष्ट्रवादीचा निर्णय नाही. अजित पवारांनी पक्षात फूट पाडली.
- १०.१८ वा : शिवसेना आमदार हॉटेल ललितमध्ये चर्चेसाठी जमले.
- १०.३१ वा : काँग्रेसने मुंबईत तातडीची बैठक बोलावली. नंतर काँग्रेसने आमदारांना भाेपाळला हलवण्याचा निर्णय घेतला.
- ३.४८ वा : अजितदादा समर्थक काही आमदार विशेष विमानाने दिल्लीकडेे.
- ७.४५ वा : राष्ट्रवादी विधिमंडळ गटाची बैठक. अजितदादांना पदावरून हटवले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.