आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खिशात होते 3 रुपये अन् बस स्टॉपवर सापडले 40 हजार; मग, त्याने जे केले ते ऐकून थक्क व्हाल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घरी जाण्यासाठी तिकीटाचेही पैसे नसताना जेव्हा मजुराला सापडले 40 हजार रुपये
  • एनआरआयने दिली 5 लाखांची ऑफर, स्वाभिमानी मजुराने ती देखील नाकारली

सातारा - येथील एका बस स्टॉपवर धनाजी जगदाळे (54) घरी जाण्यासाठी थांबले होते. परंतु, तिकीटासाठी पैसेच नव्हते. त्यांच्या खिशात केवळ 3 रुपये होते. अशात डोक्याला हात लावून बसले असताना धनाजींना एक बेवारस बॅग सापडली. उघडून पाहताच धनाजी थक्क झाले. त्यामध्ये 40 हजार रुपयांच्या नोटांचे बंडल होते. खिशात पैसे नसताना एवढी मोठी रक्कम पाहून कुणाचीही नियत फिरेल. परंतु, यानंतर धनाजींनी जे काही केले त्याचे देशभर कौतुक केले जात आहे.

मग केले असे काही...

धनाजींनी सांगितल्याप्रमाणे, ''ही घटना दिवाळीची आहे. मी दिवाळीच्या कामानिमित्त गेलो होतो. त्यावेळी बस स्टॉपवर मला नोटा सापडल्या. जवळपास असलेल्या लोकांना विचारपूस करून अप्रत्यक्षरित्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला, की त्यांचे काही हरवले नाहीत ना? परंतु, कुणीच असे सापडत नव्हते. अशात किती तरी वेळ मी तेथेच थांबलो. तेव्हा एका व्यक्तीवर माझी नजर गेली. तो अतिशय गंभीर होता आणि काही तरी शोधत होता. मी त्याला जवळ जाऊन विचारपूस केली, तेव्हा त्याने माझे 40 हजार रुपये हरवल्याचे सांगितले. त्याला मी ती संपूर्ण रक्कम दिली."

फक्त 7 रुपये घेतले

गोष्ट येथे संपत नाही. ज्याचे हे पैसे होते त्याने ती रक्कम आपल्या पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी गोळा केली होती. रक्कम पुन्हा आपल्या हातात येताच तो इतका खुश झाला की बक्षीसाची ऑफर दिली. लगेच खिशात हात घालून एक हजार रुपये धनाजींना देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा धनाजींनी ते घेण्यास स्पष्ट नकार दिला. धनाजींना घरी जाण्याच्या तिकीटासाठी 10 रुपये लागत होते. त्यांच्या खिशात 3 रुपये होते आणि त्यांनी त्या व्यक्तीकडून बक्षीस म्हणून केवळ 7 रुपये घेतले.

5 लाख रुपयांची ऑफरही ठोकरली

धनाजींच्या प्रामाणिकतेची गोष्ट सोशल मीडिया आणि वृत्तपत्रांमध्ये व्हायरल झारली. केवळ देशातच नव्हे, तर परदेशात सुद्धा त्यांच्या चर्चा सुरू झाल्या. यावरून अमेरिकेत राहणारे महाराष्ट्रातील राहुल बडगे यांनी धनाजींना बक्षीस म्हणून 5 लाख रुपये देण्याचे ठरवले. परंतु, धनाजींनी ही ऑफर देखील विनम्रपणे नाकारली. कुणाचेही पैसे घेऊन समाधान मिळणार नाही. लोकांनी प्रामाणिकपणे आपले जीवन जगावे एवढाच संदेश देईन, असे धनाजी म्हणाले. कित्येक नेते आणि दिग्गजांनी धनाजींचा सत्कार केला. परंतु, त्यांनी कुणाकडूनही पैसे घेतले नाही.