आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ऑस्कर' अध्यक्षांच्या उपस्थितीत पार पडला 56 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा; 'भोंगा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 56 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा 26 मे रोजी वरळीतील 'नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया' येथे पार पडला. यावेळी ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली यांची मुख्य उपस्थिती होती. 2020 मध्ये ऑस्कर अकादमीतर्फे जागतिने सिनेमाचे संग्रहालय तयार करण्यात येणार आहे. तसेच भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा पुतळा म्युझियममध्ये उभारण्यासाठी राज्य सरकार आग्रही असलल्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. या सोहळ्यात 'भोंगा' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळाला, तर के.के. मेनन आणि मुक्ता बर्वे यांना सर्वोत्कृष्ट अभिनायसाठी पुरस्कार पटकावले. 

 

या सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी हजेरी लावली होती. अभिनेता भरत जाधव आणि अभिनेत्री सुषमा शिरोमनी यांना चित्रपती व्ही.शांताराम पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर संकलक वामन भोसले आणि अभिनेते परेश रावल यांना राज कपूर पुरस्काराने गौरवण्यात आले. 3 लाख रूपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. जॉन बेली, विनोद तावडे, संकलक कॅरॉल लिटलटन तसेच गेल्या वर्षीच्या पुरस्कर्त्यांच्या हस्ते या वर्षीचे विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

 

मुंबईत ऑस्कर अकॅडमीचे कार्यालय सुरु केल्यास आशियातले केंद्र म्हणून पाहता येईल'

दरम्यान अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अँड सायन्सेसचे (ऑस्कर अॅवॉर्डस) कार्याल मुंबईत स्थापन करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत राज्य सरकारमार्फत करण्यात येईल. सध्या भारतात सर्वाधिक सिनेमांची निर्मिती केली जाते. 'बॉलिवूड नगरी असलेल्या भारतात बेली हे प्रथमच आले असल्यामुळे अत्यंत आनंद होत आहे. सध्या लंडन आमि युरोप येथे ऑस्कर अकॅडमीचे कार्यालय आहेत. पण मुंबईत कार्यालय सुरु केल्यास याकडे याकडे आशियातले केंद्र म्हणून पाहता येईल' असा विश्वास सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला. 

 

भोंगा सर्वोत्कृष्ट ग्रामीण तर एक सांगायचंय-अनसेड हार्मनी सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट
यावर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून तिसऱ्या नंबरवर तेंडल्या, दुसरा बंदिशाळा आणि पहिला क्रमांकावर भोंगा हे चित्रपट ठरले. भोंगा सर्वोत्कृष्ट ग्रामीण तर एक सांगायचंय-अनसेड हार्मनी हा सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट ठरले. 

 

पुरस्कार

सर्वोत्कृष्ट चित्रपट - भोंगा
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - मुक्ता बर्वे (बंदिशाळा)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - छाया कदम (न्यूड)
सर्वोत्कृष्ट अभिनेता - के.के. मेनन (एक सांगायचंय - अनसेड हार्मनी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - स्वानंद किरकिरे (चुंबक)
सर्वोत्कृष्ट कथा   -   सुधाकर रेड्डी (नाळ)
सर्वोत्कृष्ट पटकथा -   शिवाजी लोटन पाटील आणि निशांत धापसे (भोंगा)
सर्वोत्कृष्ट गीत   -   संजय पाटील (बंदिशाळा) 
सर्वोत्कृष्ट संवाद  -   विवेक बेळे (आपला माणूस)
सर्वोत्कृष्ट संगीत  -    राजेश सरकटे (मेनका उर्वशी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - विजय गवंडे (बंदिशाळा)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - ऋषिकेश रानडे (व्हॉट्सअप लग्न)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - प्रियंका बर्वे (बंदिशाळा)
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक - उमेश जाधव (मेनका उर्वशी)
सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता - फिरोज शेख (तेंडल्या)
सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री - गौरी कोठवदे (पुष्पक विमान)
सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती - शांताई मोशन पिक्चर्स (बंदिशाळा)
सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शन - सचिन जाधव आणि नचिकेत वाईकर (तेंडल्या)