Home | Sports | Other Sports | maharashtra team not included in kabbadi

महाराष्ट्राचा एकही संघ नसल्याबद्दल आयोजकांनाही खंत!

विनायक दळवी - मुंबई | Update - May 30, 2011, 06:27 PM IST

सातासमुद्रापलीकडे गेलेल्या कबड्डी या मराठमोळ्या खेळाला आता व्यावसायिकतेची हवा लागली आहे.

 • maharashtra team not included in kabbadi

  सातासमुद्रापलीकडे गेलेल्या कबड्डी या मराठमोळ्या खेळाला आता व्यावसायिकतेची हवा लागली आहे. याकामी आंध्र प्रदेशने पुढाकार घेतला असून, येत्या 8 ते 16 जून या कालावधीत विजयवाडा येथे कबड्डी प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात येणार आहे. या लीगमध्ये महाराष्ट्राचा एकही संघ नाही, अशी खंत व्यक्त होत असतानाच भारतीय कबड्डी महासंघाचे सरचिटणीस जगदीश्वर यादव यांनी आयोजक कमी पडल्याचे मान्य केले आहे.

  ‘दिव्य मराठी’शी यासंदर्भात बोलताना यादव म्हणाले, ‘‘महाराष्ट्राने कबड्डीच्या बाबतीत देशाला भरभरून दिले आहे. पहिल्यावहिल्या कबड्डी प्रीमियर लीगसाठी आम्ही महाराष्ट्रात संघ मिळविण्याचा प्रयत्नच केला नाही. आम्ही पुरस्कर्ते, संघ आणि फ्रॅन्चायझी आणण्याचे काम के. पी. राव कन्सल्टिंग कॉर्पोरेशनला दिले होते. त्यांनी जे संघ आणले तेच आम्ही स्पर्धेत उतरविले. यापुढील स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील फ्रॅन्चायझीचा संघ आणण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू, असे यादव म्हणाले.

  यादव पुढे म्हणाले, कबड्डी ‘ऑलिम्पिक’ स्पर्धांमध्ये गेली पाहिजे, असे म्हणतो. मात्र त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर हा खेळ पोहोचण्यासाठी वेगळे प्रयत्नच करीत नाहीत. म्हणून कबड्डी प्रीमियर लीग (के. पी. एल.) हा आमचा एक प्रयत्न आहे. या स्पर्धेच्या सर्वच्या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण दररोज सलग 4 तास असेल. असे 9 दिवस डी. डी. स्पोर्ट्सवर हे प्रक्षेपण चालेल. त्यामुळे भारताचे मान्यवर कबड्डीपटूंचे चेहरे घराघरात पाहायला मिळतील. त्यांची ओळख लोकांना होईल. कबड्डी या खेळाची जनमानसातील प्रतिमा उंचावेल.

  पुरस्कर्त्यांना, जाहिरातदारांनाही त्याचा लाभ होणार आहे. पहिली स्पर्धा विजयवाडा शहरात आहे, पण यापुढील स्पर्धा वेगवेगळ्या शहरांमध्ये असेल. त्यामुळे देशाच्या विविध भागांतील लोकांनाही आकर्षित करता येईल, असे यादव म्हणत होते. पहिल्या स्पर्धेनंतर 8 संघांना यापुढील दोन वर्षांसाठी करारबद्ध करण्यात येणार आहे.

  या स्पर्धेत खेळणार्‍या खेळाडूंना प्रत्येकी 50 हजार रुपये मानधन मिळणार आहे. कबड्डीमध्ये असे प्रथमच घडत आहे.

Trending