Maharashtra Special / महाराष्ट्र : अडीच कोटी किमतीच्या दुतोंडी सापासह दोन जणांना अटक


याचा वापर औषध व सौंदर्य प्रसाधन उत्पादनांमध्ये होतो

दिव्य मराठी नेटवर्क

May 31,2019 10:40:00 AM IST

ठाणे-महाराष्ट्रातील ठाण्यातून सुमारे २.५ कोटी रुपये किमतीच्या दुतोंडी सापासह पोलिसांनी दोघांना अटक केली. नवघर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राम बालसिंग यांनी सांगितले की, पोलिसांनी दोन संशयितांना पकडले आणि त्यांची पिशवी तपासली. त्यांची अवैध वन्यजीव बाजारातील किंमत दोन कोटी ४५ लाख रु. आहे. आरोपी साप विकण्याची योजना आखत होते. मुंबईत राहणारे वाजिद हुसेन मोहंमद युसूफ कुरेशी(४७) आणि शंभू अच्छेलाल पासवान(३९) यांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. आरोपींनी साप कुठे पकडला याची माहिती पोलिस घेत आहेत.

दुतोंडी साप वन्यजीव संरक्षण अधिनियमाअंतर्गत एक बिगरविषारी संरक्षित प्रजाती आहे. या सापाचा वापर औषध, सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी व काळ्या जादूसाठी केला जातो.

X
COMMENT