आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिला या आपल्या मुली, आई, बहिणी आहेत असे काम महाराष्ट्र नक्कीच करेल- सुप्रिया सुळे

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • हिंगणघाट हल्ला प्रकरणाचा केला निषेध

मुंबई- पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या अशा घटनांना आळा बसण्यासाठी राज्यात अशा विकृत गोष्टी करणाऱ्या व्यक्तीला कठोर शिक्षाच झाली पाहिजे अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

आज वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट येथे एका मुलीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचा सुप्रिया सुळेंनी जाहीर निषेध केला आहे. मागच्या वेळी आघाडी सरकार असताना तत्कालीन मंत्री राजेश टोपे यांनी छेडछाड मुक्त महाराष्ट्र असा कार्यक्रम राबवला होता. हा कार्यक्रम पुन्हा राबवण्याची गरज असल्याचे मतही खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केले आहे.

छेडछाडीबाबत अनेक कठोर कायदे सरकारने केले आहेत. परंतु यात वेळेला मर्यादा असणे गरजेचे आहे. 60 ते 90 दिवसांच्या आत कठोर शिक्षा झालीच पाहिजे. याबाबत योग्य ती पावले उचलत युवा पिढीला नवी दिशा हे सरकार दाखवेल व जनतेला मोकळा श्वास घ्यायचा अधिकार पुन्हा मिळवून देईल शिवाय महाराष्ट्रातून देशाला एक आदर्श संदेश जाईल की महिला या आपल्या मुली, आई, बहिणी आहेत व हे काम महाराष्ट्र नक्कीच करेल असा विश्वासही खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...