आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Maharashtra Will Get Stable Government Soon, Says Pruthviraj Chavan, News Updates

राज्यातल्या सत्तापेचावर चर्चा झाली, लवकरच महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल- पृथ्पीराज चव्हाण  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्र बैठक

नवी दिल्ली- महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी दिल्लीत काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक झाली. संध्याकाळी पाच वाजता या बैठकीला सुरुवात झाली होती. त्यानंतर माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सकारात्मक चर्चा झाली. उद्याही ही चर्चा होणार आहे. तसेच, लवकरात लवकर राज्यात एक स्थिर सरकार स्थापन होईल.माध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले की, बैठकीत शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यासाच्या दृष्टीने सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. किमान समान कार्यक्रम, त्याची अंमलबजावणी, सत्तास्थापनेतील अडथळे अशा सर्वांगीण बाजूने विचार करण्यात आला. लवकरच राज्याला एक स्थिर सरकार मिळेल. पवारांच्या निवास्थानी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीकडून अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, सुनील तटकरे, अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, नवाब मलिक तर काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, जयराम रमेश, सी वेणुगोपाल, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नसीम खान असे एकूण 15 जणांनी चर्चा केली. सोनिया गांधींचा होकार?


राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्हं दिसत आहेत. कारण काँग्रेस हायकमांडच्या दिल्लीतील बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत जाण्यास संमती दर्शवली आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...