आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 तासांच्या अंतरात गोल्डन चाैकार; खो-खोमध्ये महाराष्ट्र युवांना दीड महिन्यात दहा सुवर्णपदके 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- युवा संघांनी आपापले वर्चस्व अबाधित ठेवताना मराठमोळ्या खो-खो खेळात यजमान महाराष्ट्राच्या संघाला गुुरुवारी खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये सोनेरी यश मिळवून दिले. याच अव्वल कामगिरीच्या बळावर महाराष्ट्राने स्पर्धेत गोल्डन चाैकार मारला. महाराष्ट्राचे १७ आणि २१ वर्षांखालील पुरुष-महिला संघ एकाच दिवशी स्पर्धेत चॅम्पियन ठरले. या संघांनी ९ तासाच्या अंतरात चारही गटात सुवर्णपदकांची कमाई केली. यासह टीमला आपला दबदबा कायम ठेवता आला. महाराष्ट्राच्या युवा संघांनी १७ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या गटात सलग दुसऱ्या वर्षी किताब जिंकला. हे दोन्ही संघ गत वर्षी दिल्ली येथील स्पर्धेतही सुवर्णपदकाचे मानकरी होते. 

महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील व २१ वर्षांखालील खो-खो संघांनी गुरुवारचा दिवस गाजवला. सर्वांचे लक्ष लागून असलेल्या खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळांडूनी अपेक्षेप्रमाणे आपले वर्चस्व सिद्ध करत चारही सुवर्णपदके आपल्या नावावर केली. सोलापूरची जान्हवी पेठे ही स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराची मानकरी ठरली. तिला २१ हजारांचे बक्षिस देऊन गाैरवण्यात आले. 

 

बॉक्सिंगमध्येही महाराष्ट्राच्या खेळांडूनी अंतिम फेरीत प्रवेश केला असून पदक निश्चित केले आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सर्वच क्रीडा प्रकारांत आपली प्रबळ दावेदारी सिद्ध करत सुवर्णपदकांची लयलूट केली. हीच सुवर्णमय कामगिरी पुढे नेत खो-खो संघाने १७ वर्षांखालील मुला-मुलींचा संघ, तर २१ वर्षांखालील मुला-मुलींच्या संघाने चार सुवर्णपदके खेचून आणली. 

 

प्रथमच ४ सुवर्णपदके : 
महाराष्ट्राने प्रथमच खेलो इंडियाच्या एकाच इव्हेंटमध्ये चार सुवर्णपदकांची नोंद केली. खो-खो मध्ये महाराष्ट्राने हे यश मिळवले. यामध्ये १७ आणि २१ वर्षाखालील गटांचा समावेश आहे. 

खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये मुलींच्या गटात यजमान महाराष्ट्र आणि दिल्ली यांच्यात खो-खोचा सामना रंगला. यजमानांच्या महिलांनी अंतिम सामना जिंकला. 
 

बातम्या आणखी आहेत...