आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेगा भरती : जिल्हा परिषदेत 13,521 पदासांठी होतीये भरती; 10 पाससाठी सुवर्ण संधी, 26 मार्च पासून करू शकता अर्ज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर ही बातमी तुमच्यासाठी चांगली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदेत अनेक पदांसाठी अर्ज मागविले आहे. इच्छुक उमेदवार 16 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करू शकतात. आरोग्यसेवक, पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविका, विस्तार अधिकारी आणि इतर पदांसाठी एकून 13,521 रिक्त जागांची यादी जाहीर केली आहे. संबंधित विषयात माध्यमिक. डिग्री / डिप्लोमा धारक या पदांसाठी अर्ज सादर करून शकतात. 
 

पदाचे नाव : आरोग्य सेवक, लिपीक, स्थापत्य अभियंता सहायक, विस्तार अधिकारी, औषध निर्माता   

पद संख्या : 13,521

 

रिक्त जागांचे जिल्हानिहाय वर्गीकरण 
अहमदनगर - 729, अकोला - 242, अमरावती - 463, औरंगाबाद - 362, वांद्रे - 142, हिंगोली - 150, लातूर - 286, नाशिक - 687 यांसह इतर शहरांतही रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. 

 

निवड प्रक्रिया - लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे.  

 

पात्रता : पदानुसार उमेदवारांची पात्रता ठरविण्यात आली आहे. 
> औषध निर्माता - B.Pharm, औषध निर्मितीत पदवी किंवा समतुल्य
> विस्तार अधिकारी आणि वरिष्ठ सहायक  -  मान्यता प्राप्त विद्यापीठातील पदवी
> स्थापत्य अभियंता पदासाठी - स्थापत्य अभियांत्रिकी एक वर्षाचा डिप्लोमा 


 
अर्ज शुल्क -
> सामान्य आणि ओबीसी वर्गासाठी 500 रूपये
> एससी/एसटी वर्गासाठी 250 रुपये


महत्वाच्या तारखा 
> ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - 26 मार्च 2019
> ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 16 एप्रिल 2019


अर्ज कसा करावा 
उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करू शकतो. 
|

बातम्या आणखी आहेत...