आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सागर कारंडेच्या धाकाने सईने गायले गाणे, मानसी नाईक आणि वैभवच्या डान्सचा तडका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः 'झी टॉकीज' ही मराठी चित्रपट वाहिनी दरवर्षी 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' हा सोहळा आयोजित करते. यंदाचे वर्षसुद्धा याला अपवाद नव्हते. दरवर्षीप्रमाणेच, यंदाही 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' हा भव्यदिव्य सोहळा तारेतारकांच्या उपस्थितीत पार पडला. यंदाच्या सोहळ्यात अनेक रंजक गोष्टी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. सई ताम्हणकरने गायलेले 'शिट्टी वाजली' हे गाणे सुद्धा यंदाच्या सोहळ्यातील मुख्य आकर्षण ठरले आहे. अभिनेता सागर कारंडे याने पोलिसाच्या भूमिकेत स्टेजवर एंट्री घेतली. एवढेच नाही, तर सागरने थेट प्रेक्षकांमध्ये जाऊन त्याने सगळ्या उपस्थित कलाकारांना पोलिसी जरब दाखवली. सईने या पोलिसाचा धाक घेतल्याचं सगळ्यांनाच पाहायला मिळालं. अर्थात, तिने सादर केलेले  गाणे हा सगळ्यांच्या मनोरंजनाचा मोठा विषय ठरला आहे.

  बोल्ड अँड ब्युटीफुल सई ताम्हणकर ही अनेक तरुणांच्या दिलाची धडकन आहे. तिच्या अदा, बोल्ड अवतार यावर सगळेच जण फिदा असतात. तिने तिच्या अभिनयासोबत तिच्या आवाजाने देखील सगळ्यांना मदहोश केलं आहे. तिचं 'का जीव तोळा तोळा' हे गाणं अजूनही प्रेक्षकांच्या ओठांवर आहे. पण सगळ्यांची लाडकी सई, चक्क एका पोलिसाला घाबरलेली पाहायला मिळाली. या पोलिसाने तिला चक्क गाणे गाण्यास सांगितले. तिने सुद्धा 'शिट्टी वाजली' हे गाणे आपल्या आवाजात सगळ्यांसमोर सादर केले. 

  • वैभवचा दुहेरी धमाका; सूत्रसंचालन आणि डान्सचा जलवा

तरुणींचा लाडका आणि चार्मिंग अभिनेता वैभव तत्ववादी, याने 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' या भव्यदिव्य सोहळ्याचे सूत्रसंचालन केले आहे. अप्रतिम सूत्रसंचालनाबरोबर, त्याने आपल्या डान्सचा जलवा सुद्धा दाखवला. या हँडसम हंकच्या सोबतीने प्राजक्ता माळी, पल्लवी पाटील आणि शिवानी सुर्वे या तिन्ही ललनांनी सुद्धा आपल्या डान्सचा धमाका दाखवला. या चौघांचा धमाकेदार परफॉर्मन्स पाहताना, सर्व प्रेक्षक आणि सेलिब्रिटी मंडळींचे भरपूर मनोरंजन झाले. वैभवची तिघींसोबतची केमिस्ट्री जबरदस्त होती. यंदाच्या 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' या सोहळ्यातील हे एक मुख्य आकर्षण ठरले आहे. 

  • 'महाराष्ट्रचा फेवरेट कोण २०१९'मध्ये पाहायला मिळणार मानसी नाईकच्या डान्सचा जलवा