आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - महाराष्ट्र हे देशाचे असे राज्य आहे, जेथे सर्वात जास्त राजकारण्यांची कुटुंबे सक्रिय आहेत. डेमोक्रॅटिक वंशवादाच्या दुसऱ्या भागात आज वाचा या १२ दिग्गज कुटुंबांशी संबंधित ४३ चेहऱ्यांबाबत. पवार, ठाकरेंपासून चव्हाण, पाटीलपर्यंत... या कुटुंबांच्या अवतीभाेवतीच महाराष्ट्राची सत्ता फिरत असते. अनेक दशकांपासून यातील काही कुटुंबांचे किती तरी जागांवर वचस्व आहे. यावरून त्यांचा दबदबा व मानाचा अंदाज लावता येऊ शकताे. जसे- बारामती... ही जागा २७ वर्षांपासून पवार कुटुंबाकडेच आहे.
पवार (४ पिढ्या)
शारदाबाई : १९३६मध्ये पुणे लोकल बोर्डाच्या सदस्या.
पुत्र: शरद पवार : ३८ व्या वर्षी शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. चारदा मुख्यमंत्री. स्वत:चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. यूपीएत मंत्री हाेते.
नातू : अजित पवार : शरद पवारांचे पुतणे अजित पवार हे उपमुख्यमंत्री हाेते. बारामतीतून आमदार.
नात : सुप्रिया सुळे : २००६ मध्ये राज्यसभा सदस्य, तर २००९ व २०१४ मध्ये बारामतीतून खासदार बनल्या.
पणतू : रोहित-पार्थ : शरद पवारांचे नातू राजकारणात सक्रिय. या वेळी निवडणूक लढवणार.शिवसेनेचे जसे मुंबईत आहे तसेच या कुटुंबाचे बारामतीत वर्चस्व.
ठाकरे (३ पिढ्या)
बाळासाहेब ठाकरे : १९ जून १९६६ राेजी शिवसेनेची स्थापना.
पुत्र: उद्धव ठाकरे
नातू : आदित्य ठाकरे : शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष. शिवसेनेत क्रमांक दाेनचे पद.
ठाकरे कुटुंबाचे घर 'मातोश्री' चा आदेशच मुंबईत अंतिम मानला जाताे. त्यांच्या मंजुरीविना या शहरात काेणताही अधिकारी राहू शकत नाही इतका दरारा. सध्या शिवसेनेचे अध्यक्ष. हे कुटुंब राजकारणात सक्रिय; परंतु ठाकरे कुटुंबातून कुणीही काेणतीही निवडणूक लढले नाही.
पुतण्या : राज ठाकरे : राेखठाेक व करारी स्वभाव. शिवसेनेत मतभेदानंतर स्वत:चा पक्ष मनसेची स्थापना.
मुंडे कुटुंब (२ पिढ्या) : गोपीनाथ मुंडे: भाजपचे दिग्गज दिवंगत नेते. महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. केंद्रात मंत्री झाले. मोठी मुलगी पंकजा महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्री आहेत. दुसरी मुलगी प्रीतम बीडच्या खासदार. पुतण्या धनंजय विधान परिषदेत राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत.
खडसे कुटुंब (२ पिढ्या)
एकनाथ खडसे: भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री. खडसेंची पत्नी मंदा जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा, मुलगी रोहिणी जळगाव जिल्हा बँक अध्यक्ष. खडसेंची सून रक्षा खडसे रावेरमधून लोकसभेच्या विद्यमान खासदार आहेत.
चव्हाण कुटुंब (२ पिढ्या)
शंकरराव: काँग्रेसतर्फे दोनदा मुख्यमंत्री. आधी १९७५, नंतर १९८६ मध्ये. केंद्रात अर्थ आणि गृहमंत्री होते. मुलगा अशोक चव्हाणही मुख्यमंत्री राहिले आहेत. अशोक यांची पत्नी अमिता आमदार राहिल्या आहेत. सध्या नांदेडसाठी त्यांची चर्चा आहे.
निलंगेकर (३ पिढ्या)
शिवाजीराव निलंगेकर १९८५-८६ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. काँग्रेसचे दिग्गज नेते. त्यांचा मुलगा दिलीप आमदार होते. सून रूपाताई खासदार होत्या. नातू संभाजी सध्या राज्यातील भाजप सरकारमध्ये मंत्री आहेत.
भुजबळ कुटुंब (२ पिढ्या)
छगन चंद्रकांत भुजबळ: बाळासाहेब ठाकरेंमुळे प्रभावित होऊन शिवसेनेत दाखल. १९८५ मध्ये मुंबईचे महापौर. नंतर राष्ट्रवादीत गेले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. मुलगा पंकज आमदार आहेत. पुतण्या समीर २००९ मध्ये खासदार होते.
मोहिते पाटील (३ पिढ्या)
शंकरराव १९५२ ते १९७२ पर्यंत सक्रिय. ४ वेळा आमदार होते. मुलगा विजयसिंह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते. उपमुख्यमंत्रीही होते. त्यांचे भाऊ प्रताप भाजप खासदार होते. विजयसिंहांचा मुलगा रणजीत हे राज्यसभा खासदार होते.
विखे कुटुंब (३ पिढ्या)
बाळासाहेब विखे पाटील: बाळासाहेब सात वेळा अहमदनगर उत्तरमधून जिंकले. केंद्रात मंत्री होते. मुलगा राधाकृष्ण महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते. राधाकृष्ण यांची पत्नी शालिनी अहमदनगरच्या जि. प. अध्यक्ष. मुलगा सुजय यंदा लोकसभेच्या मैदानात आहेत.
वसंतदादा पाटील (3 पिढ्या)
१९७७ ते ७८ मुख्यमंत्री होते. १९८३ ला पुन्हा सीएम. पत्नी शालिनीताई कॅबिनेट मंत्री होत्या. १९८० मध्ये खासदार झाल्या. मुलगा प्रकाश २००९ च्या आधी सांगलीचे खासदार होते. दादांचे नातू प्रतीक २००९ मध्ये सांगलीचे खासदार.
देशमुख (२ पिढ्या ): विलासराव मुख्यमंत्री होते. मुलगा अमित आमदार.
कदम (२ पिढ्या): पतंगराव महाराष्ट्रात मंत्री होते. मुलगा विश्वजीत युकाँ अध्यक्ष
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.