Home | Sports | Other Sports | Maharashtra's victorious hatrick, Maharashtra beat Rajasthan in Football

महाराष्ट्राची विजयी हॅट‌्ट्रिक, दुर्वेशने केला निर्णायक गोल; महाराष्ट्राची राजस्थानवर मात, दुर्वेशच्या गोलवर 1-0 ने विजय 

अजित संगवे | Update - Feb 13, 2019, 08:45 AM IST

सकाळी झालेल्या सामन्यात गुजरातने नवोदित दादरा व नगर हवेलीचा दहा गोलने फडशा पाडला.

  • Maharashtra's victorious hatrick, Maharashtra beat Rajasthan in Football

    सोलापूर- जबरदस्त फॉर्मात असलेल्या यजमान महाराष्ट्र संघाने आपल्या घरच्या मैदानावर सरस खेळी करताना मंगळवारी संताेष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीत विजयाची हॅट‌्ट्रिक साजरी केली. महाराष्ट्राने स्पर्धेतील आपल्या तिसऱ्या सामन्यात राजस्थानचा पराभव केला. महाराष्ट्राने १-० अशा फरकाने सामना जिंकला. यजमान महाराष्ट्र संघाचा स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय ठरला. दुर्वेश निजपने (६२ वा मि.) निर्णायक गाेल करून महाराष्ट्राला राेमहर्षक विजय मिळवून दिला. सलग तिसऱ्या विजयासह महाराष्ट्राने सर्वाधिक ९ गुण मिळवून मुख्य फेरीतील प्रवेश बळकट केला. निर्णयाक गोल नोंदवणारा महाराष्ट्राचा दुर्वेश निजप हा विजयाचा हीरो ठरला.

    जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रा. पुरणचंद्र पुंजाळ यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन सामने जिंकून ब गटातून महाराष्ट्रानेही पात्रता सिद्ध केल्याने राजस्थान विरुद्ध काहीशा संथ खेळाचे धोरण अवलंबले. तुलनेत राजस्थानने बचावात्मक पवित्रा घेतल्याने गोलचे खाते उघडण्यासाठी महाराष्ट्राला उत्तराधा॑ची वाट पाहावी लागली. पूर्वार्धात महाराष्ट्राचा कर्णधार लिनेकर मिचॅडोने मारलेली फ्री किक राजस्थानचा गोलरक्षक होझेप खिस्तीने निष्फळ ठरवली. उत्तरार्धात गोल करण्यासाठी महाराष्ट्राच्या विनोदकुमार पांडे, मृणाल तांडेल, अमन गायकवाड यांनी जोरदार प्रयत्न केले. सामन्याच्या ६२व्या मिनिटाला रचलेल्या चालीत संकेत साळुंखेच्या उत्कृष्ट पासवर निजपने सुरेख फटक्यादवारे महत्त्वपूर्ण गोलची नोंद केली. पाठोपाठ संकेत साळुंखेचा फटका गोल खांबाला चाटून गेला.

    गुजरातचा पवन ठरला सामनावीर :
    सकाळी झालेल्या सामन्यात गुजरातने नवोदित दादरा व नगर हवेलीचा दहा गोलने फडशा पाडला. पाच गोल नोंदवणारा गुजरातचा आघाडीपटू पवन रामानुज सामनावीर ठरला.त्याने सामन्याची सूत्रे हाती घेत आपला पहिला तर संघाचा चौथा गोल करून नामोहरम केले. बचावपटू नितीन शिंगणेने पाचवा गोल करून दादरा-नगर हवेलीच्या दुखण्यावर मीठ चोळले. उत्तरार्धातही गोलचा धडाका कायम राहिला. पुन्हा रामानुजने आपला दुसरा व संघाचा सहावा गोल केला. त्याने ६६ व १९व्या मिनिटाला गोल करून हॅटट्रिकसह संघाची आघाडी ८-० अशी केली. दमलेल्या दमण-दीववर आदित्य झाने गोल करून सामना ९-०असा केला.

Trending