आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रामध्ये 60.46% मतदानाची नोंद; हरियाणात 65.66% मतदान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांत साेमवारी सरासरी ६०.४६% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज निवडणूक आयाेगाने वर्तवला आहे, मात्र अंतिम आकडेवारीत वाढ हाेऊ शकते व २०१४ प्रमाणे यंदाही ६३ टक्क्यांपर्यंत मतदानाचा टक्का जाऊ शकताे. विविध एक्झिट पोेलच्या अंदाजानुसार पुन्हा महायुतीचे सरकार आरूढ होण्याची शक्यता आहे. प्राथमिक अंदाजानुसार, सर्वात कमी मतदान मुंबईतील कुलाब्यात ४०.२०%, तर सर्वात जास्त मतदान कोल्हापूरच्या करवीरमध्ये ८३.२०% झाले. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत ६४.२५% मतदान झाले. मतदानाची अंतिम टक्केवारी मंगळवारी दुपारपर्यंत येईल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी दिली. २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी हाेऊन निकाल जाहीर होईल
 

सर्वाधिक मतदान
> करवीर ८३.२०% 
>शाहूवाडी ८०.१९% 
> कागल ८०.१३% 
> शिराळा ७६.७८%

सर्वात कमी मतदान
> कुलाबा ४०% 
> उल्हासनगर ४१% 
> कल्याण ४१.९% 
> अंबरनाथ ४२.४% 
> मुंबईतील वर्सोवा ४२.६६%
 

हरियाणात 65.66% मतदान

चंदिगड | हरियाणातील ९० विधानसभा मतदारसंघात सोमवारी ६५.६६ % मतदानाची नोंद झाली. राज्यात सध्या भाजपचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे सरकार आहे. येथे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ७६.५४% मतदान झाले होते. बहुमताचा आकडा ६४ आहे. 
> एक्झिट पोलच्या सरासरीनुसार भाजप युतीला 66, तर काँग्रेस आघाडीला 14 व इतरांना 10 जागा मिळण्याची शक्यता आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...