आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदकतालिकेत अव्वल स्थान अधिक मजबूत; महाराष्ट्रच्या नावे ऑता १६४ पदकांची नोंद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत खेळाडूंच्या दमदार कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघाची सुवर्णपदकरूपी पतंगाने आकाशात उंच भरारी घेतली आहे. या उंचावलेल्या कामगिरीमुळे महाराष्ट्राने पदकतालिकेत मानाचे स्थान गाठले आहे. यजमान संघाने  सोमवारी  वेटलिफ्टिंगमध्ये एक सुवर्ण, तर  स्विमिंगमध्ये दोन, तीन रौप्य व दोन कांस्य पटकावले, तर आपल्या लौकिकानुसार १७ वर्षांखालील व २१ वर्षांखालील गटात खो-खोच्या संघाने आपले  वर्चस्व कायम ठेवले. यामुळे  महाराष्ट्राच्या खात्यात ५९ सुवर्णांसह १६४ पदकांची नोंद झाली. पदकतालिकेतील महाराष्ट्राची आघाडी कायम आहे. 


पुण्यातील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया यूथ गेम्सचे आयोजक असलेल्या महाराष्ट्र संघाच्या  खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पहिल्या दिवसापासून महाराष्ट्राच्या संघाचे सर्वच क्रीडा प्रकारांत वर्चस्व राहिले आहे. सोमवारी सांगलीच्या वैष्णवी पवार हिने २१ वर्षांखालील वयोगटात  ११४ गुणांची कमाई करत सुवर्णपदक पटकावत  पदकाच्या खात्यात भर घातली. जलतरणामध्ये केनिशा गुप्ता व अपेक्षा फर्नांडिस यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. आकांक्षा बुचडे, रुद्राक्ष मिश्रा, शेरॉन साजू  यांनी रौप्य, तर साहिल पवार, साध्वी धुरी यांनी कांस्यपदक मिळवले. खो-खोमध्ये २१ वर्षांखालील गटातील मुले व मुली तसेच १७ वर्षांखालील मुलांनी आक्रमक खेळी करत खो-खोच्या बाद फेरीत विजय प्राप्त केला. मुलांच्या २१ वर्षांखालील गटात महाराष्ट्राने सरस खेळी करताना शानदार विजय साकारला. 

बातम्या आणखी आहेत...