Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Maharshtra's DNA has congress in it, Watchman feel bad because of Modi

महाराष्ट्राचा ‘डीएनए’ काँग्रेसचाच; निवडणुकीत महाराष्ट्र काँग्रेसच्या बाजूने उभी राहील-राहूल गांधी

प्रतिनिधी | Update - Apr 16, 2019, 09:26 AM IST

मोदींमुळे चौकीदार झाले बदनाम

  • Maharshtra's DNA has congress in it, Watchman feel bad because of Modi

    नांदेड- महाराष्ट्राचा डीएनए हा काँग्रेसचा आहे. येथील लोकांची विचारसरणी काँग्रेसचीच आहे. देशात द्वेष पसरवून राज्य करता येत नाही हे महाराष्ट्रीय लोकांना चांगलेच माहीत आहे. यामुळे या निवडणुकीत महाराष्ट्र काँग्रेसच्या बाजूने उभी राहील,’ असा विश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी नांदेडमध्ये व्यक्त केला.

    नांदेड, लातूर, हिंगोली व परभणीतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. सभेला उशीर झाल्याने सुरुवातीलाच राहुल यांनी उपस्थितांची माफी मागितली. मोदींवर टीका करताना राहुल म्हणाले, ‘मोदी यांनी सत्तेवर येण्यापूर्वी एक घोषणा दिली होती, अच्छे दिन, लोक म्हणायचे आएंगे, आता केवळ तुम्ही म्हणा चौकीदार सगळे म्हणतात, ‘चोर है’. मोदींनी केवळ खोटी आश्वासने दिल्याने त्याच्यामुळे सारे चौकीदार बदनाम झालेे. देशात बेरोजगारी झपाट्याने वाढत आहे. एखादा तरुण जर नवीन उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला देशात किमान १५ खात्यांच्या परवानग्या लागतात. लाच दिल्याशिवाय त्या मिळत नाहीत. काँग्रेसचे सरकार आल्यावर तुम्ही आधी व्यवसाय सुरू करा. त्यात जम बसल्यावरच ३ वर्षांनी परवानगी काढा हा नियम लागू करू,’ असे आश्वासन राहुल यांनी दिले.

    गर्दी २५ हजारांचीच : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये सभा घेतली होती. या सभेला एक लाखावर गर्दी झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते. सोमवारी राहुल यांच्या सभेला मात्र २५ हजारांचीच गर्दी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. काँग्रेसने मात्र ५० हजारांची गर्दी झाल्याचा दावा केला आहे.

Trending