आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महात्मा गांधीजींचा 7 फुटी चष्मा लिम्का बुकात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक   - तरुण पिढीला गांधीजींच्या कार्याची ओळख व्हावी, त्याचे विचार त्यांनी आत्मसात करावे या उद्देशाने काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर यांच्या  पुढाकारातून  गांधी जयंतीचे औचित्य साधत  ७ बाय ९ फुटांचा गांधीजींचा चष्मा साकारला होता. या चष्म्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली. 


महात्मा गांधीजींचे विचार तरुणाईपर्यंत पोहोचवण्यासाठी २ मे २०१७ रोजी काँग्रेस सेवा दलाच्या वतीने गांधीजींचा ७ बाय ९ आकारातील चष्मा साकारण्यात आला होता. जगातील सर्वात माेठा गांधीजींचा चष्मा म्हणून अनेक विक्रम नोंदवण्यात आलेले आहेत. देशात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या चष्म्याबाबत नोंद व्हावी यासाठी अर्ज करण्यात आला होता. सर्व कायदेशीर व नियमानुसार प्रक्रिया पार  पडल्यानंतर नुकतेच ठाकूर यांना लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचे प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलेले आहे.  


तरुणाईपर्यंत गांधीजींचे विचार पाेहोचावे हाच उद्देश  
अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या महात्मा गांधी यांचे विचार तरुणाईपर्यंत पाेहोचावे या उद्देशाने चष्मा साकारला. त्याचा एक विक्रम होणे आनंदाचीच बाब आहे. - वसंत ठाकूर, अध्यक्ष, काँग्रेस सेवा दल.

बातम्या आणखी आहेत...