आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना राष्ट्रधर्म हवा होता, धर्मराष्ट्र नव्हे; डॉ. विश्वास पाटील यांचे प्रतिपादन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- गांधीजी आजच्या काळात प्रासंगिक आहेत का? याबाबत आपल्याच देशात चर्चा होऊ शकते हे आपले दुर्दैव आहे. गांधीजींना राष्ट्रधर्म हवा होता, धर्मराष्ट्र नव्हे. मात्र, आजची सर्वच परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. या परिस्थितीतून बाहेर पडायचे असेच तर गांधी विचारांशिवाय पर्याय नाही, असे ठाम प्रतिपादन डॉ. विश्वास पाटील यांनी व्यक्त केले. 


गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे आयोजित नॅशनल गांधीयन लिडरशीप कॅम्पच्या गुरुवारी दुसऱ्या दिवसाच्या सत्रात डाॅ. पाटील बोलत होते. 'गांधी प्रासंगिकता का मर्म' या विषयावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले. २० राज्यातून आलेल्या तरुणांच्या समोर डॉ. विश्वास पाटील यांनी गांधीजींच्या तरुणपणातील अनेक उदाहरणं देऊन अभ्यासपूर्ण मांडणी केली. ते पुढे म्हणाले, तरुणाई ही शक्ती आहे, प्रवाह आहे. तरुणपण ही वृत्ती आहे, वय नाही. ज्यांचे खांदे मजबूत आहेत आणि डोकं काम करतेय तो युवा. ज्याला येणाऱ्या काळाच्या पल्याड पाहता येते तो तरुण, अशी व्याख्या करून डॉ. पाटील पुढे म्हणाले, स्वत: एकटे उभे राहण्यात ध्यैर्य लागते, हे ध्यैर्य गांधीजींनी दाखवले होते. प्रास्ताविक गांधी रिसर्च फाउंडेशनचे जॉन चेल्लादुराई यांनी केले. अश्विन झाला यांनी सूत्रसंचालन केले. 


उपवासातून गांधीजींनी दिली संयमाची शिकवण 
गांधीजींच्या जीवनातील विविध प्रसंग सांगून डॉ. पाटील म्हणाले, गांधीजींच्या जीवनात प्रामाणिकता होती. सत्य होते. सत्य ही जीवनधारा आहे. वर्तमानाला आकार देणारे आहे. वर्तमानात जगणाऱ्यांना कसलाही त्रास होत नाही. खादीच्या वापरातून त्यांनी स्वावलंबनाचा मंत्र दिला तर उपवासातून संयमाची शिकवण दिली. गांधीजींनी आपल्या संपूर्ण आयुष्यात मातृसत्ता, गुरुसत्ता, पंचसत्ता, शास्त्रसत्ता आणि शस्त्र सत्तेला विरोध केला, असे सांगितले. तसेच युवकांनी देखील विविध प्रश्न विचारून गांधीजींच्या संदर्भातील अनेक गोष्टी जाणून घेतल्या. युवकांच्या काही प्रश्नांना महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनीदेखील उत्तरे दिली. 

बातम्या आणखी आहेत...