आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mahatma Gandhi's Freedom Fight Is A Great Drama BJP MP Anant Hegde

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महात्मा गांधींचा स्वातंत्र लढा एक मोठं नाटक, असे लोक देशात महात्मा कसे होतात - भाजप खासदार अनंत हेगडे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोठ्या नेत्यांनी इंग्रजांच्या परवानगीनंतर स्वातंत्र चळवळीचे नाटक रचले - हेगडे
  • या नेत्यांनी एकदाही पोलिसांचा मार खाल्ला नाही - भाजप खासदार
  • हेगडे यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले होते

बंगळुरू (कर्नाटक) - राष्ट्रपिता महात्मा गांधीचा स्वातंत्र लढा एक मोठे नाटक होते असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेता आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतर कुमार हेगडे यांनी केले आहे. गांधीजींचे उपोषण आणि सत्याग्रह आंदोलने सुद्धा नाटक असल्याचे ते म्हणाले. रविवारी एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, स्वातंत्र्याचा संपूर्ण संघर्ष बनाव होता आणि त्याला ब्रिटीश साम्राज्याचा पाठिंबा होता. त्या काळातील तथाकथित मोठ्या नेत्यांनी एकदाही पोलिसांचा मार खाल्ला नव्हता. त्यांची स्वातंत्र चळवळ एक नाटक होते. या मोठ्या नेत्यांनी इंग्रजांच्या परवानगीनंतर हे नाटक केले. तो खरा लढा नसून एक दिखाऊ संघर्ष होता. असे हेगडे म्हणाले. 
 

गांधीजींच्या उपोषण आणि सत्याग्रहामुळे स्वांतत्र्य मिळाले नाही

अनंत हेडगे म्हणाले की, "काँग्रेसचे समर्थन करणारे लोकच म्हणतात की, भारताला उपोषण आणि सत्याग्रहामुळे स्वातंत्र मिळाले. मात्र हे खोटं आहे. इंग्रजांनी सत्याग्रहामुळे नाही, तर त्यांची निराशा आणि पराभवामुळे भारताला स्वातंत्र दिले. मी जेव्हा इतिहास वाचतो तेव्हा माझे रक्त खवळते. असे लोक आपल्या देशात महात्मा होतात." 
 
 
 
हेगडे यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले होते


हेगडे 2014 ते 2019 काळात केंद्र सरकारमध्ये कौशल्य विकास मंत्री होते. ते यापूर्वी 2017 मध्ये आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले होते. धर्मनिरपेक्ष हा शब्द लिहिलेल्या घटनेत भाजपा बदल करेल असे वक्तव्य त्यांनी केले होते. याशिवाय राहुल गांधीवर वादग्रस्त विधाने केल्यामुळे देखील ते चर्चेत राहिले आहेत. त्यांनी रविवारी ट्वीट केले की, बंगळुरू ही हिंदुत्वाची राजधानी बनली पाहिजे.