आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महात्मा फुले जीवनदायी योजनेंतर्गतही तपासण्यांचे अतिरिक्त पैसे घेत फसवणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सर्वसामान्यांना वरदान ठरणाऱ्या महात्मा फुले जीवनदायी अाराेग्य योजनेलाच उदासीनतेचा आजार जडल्याच्या तक्रारी अाहेत. गोरगरिबांना माेफत उपचारासाठी शासनाकडून ही योजना सुरू करण्यात अाली असली तरी प्रत्यक्षात मात्र तिच्या अंमलबजावणीसाठी संबंधित रुग्णालये तयार नसल्याची धक्कादायक समोर आली आहे. योजनेंतर्गत मंजूर झालेल्या उपचारानुसार रुग्णाला दीड लाखापर्यंत मोफत औषोधोपचार आणि तपासण्यादेखील करून देण्याच्या सूचना असताना काही रुग्णालये रुग्णांकडून तपासण्यांसाठी बक्कळ पैसे उकळत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत . 


महात्मा जाेतिबा फुले जीवनदायी योजनेंतर्गत वार्षिक एक लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबीयांना तब्बल ९७२ आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जात आहेत. सर्वसामान्यांना पैसा उपलब्ध नसल्याने अनेक व्याधी जडूनदेखील उपचार करता येत नाहीत. मध्यमवर्गीयांना व्याधी जडल्यास पोटाला चिमटे काढून साठवलेला पैसाही उपचारांवरच खर्च होतो. परिणामी, मध्यम व सर्वसामान्य वर्गातील लोकांना दर्जेदार उपचार घेणे शक्य होत नाही. त्यामुळे ते दारिद्र्य व व्याधींच्या चक्रातच गुरफटून पडतात. अशा लोकांसाठी ही योजना खराेखर जीवनदायी ठरणारी आहे. त्यामध्ये मुतखडा, किडनी स्टोन, मेंदूवर शस्त्रक्रिया, मणक्याचे आजार, कॅन्सर अशा शेकडो विकारांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत रुग्णांना दीड लाख रुपयांपर्यंतची औषधे, उपचार, तपासण्या मोफत करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. मात्र, शहरातील काही रुग्णालयांकडून या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या रुग्णांनाही उपचारासाठी अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी आहेत . योजनेंतर्गत मंजूर झालेल्या उपचारानुसार रुग्णाला दीड लाख रुपयांपर्यंत मोफत औषोधोपचार आणि तपासण्यादेखील करून देण्याच्या सूचना असताना काही रुग्णालये तर रुग्णांकडून अनेक तपासण्यांसाठीही पैसे घेत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत रुग्णालयांवर प्रशासनाचा कुठलाही अंकुश नसून, रुग्णांच्या तक्रारींकडे दुर्लक्षच हाेत असल्याचे दिसते.

 

या रुग्णालयांचा आहे समावेश.. 
सिव्हिल, संदर्भ, अश्विनी हॉस्पिटल, चोपडा हॉस्पिटल, डॉ. वसंत पवार वैद्यकीय रुग्णालय, जनसेवा हॉस्पिटल, लाइफ केअर, नामको, सुयोग, प्रयास, एसएमबीटी हॉस्पिटल, शताब्दी हॉस्पिटल, श्री बालाजी हॉस्पिटल, सिक्स सिग्मा-नाशिक व मालेगाव, सायखेडकर, सुजाता बिर्ला, सिनर्जी, वक्रतुंड, व्हिजन, आयुष बाल रुग्णालय, क्युरी मानवता, साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट, यशवंत हॉस्पिटल-सिन्नर, सामान्य रुग्णालय-मालेगाव, सिद्धिविनायक हॉस्पिटल-सिन्नर. 
योजनेबाबत जनजागृती गरजेची.... 
महात्मा फुले जीवनदायी योजनेसंदर्भात नागरिकांना अनेक बाबींची माहिती नाही. याचा गैरफायदा काही रुग्णालयांकडून घेतला जात आहे. योजनेत होणाऱ्या उपचारांचे अधिक पैसे काही रुग्णांकडून घेतले जातात. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

 

खासगी रुग्णालयांचा असाही फंडा... 
काही नामवंत खासगी रुग्णालयांत उपचारासाठी रुग्ण गेल्यानंतर त्यांच्याकडून अगोदर महात्मा फुले योजनेत उपचारास नकार दिला जाताे. उपचाराचा आग्रह धरलाच तर रुग्णांची फाइल मंजूर करून त्यांना शासकीय रुग्णालयात तपासण्यांसाठी पाठविले जाते. अनेक रुग्णालयांत तर या तपासण्या अामच्याकडे होणारच नाहीत, असे सांगितले जाते. यामुळे रुग्णांना संबंधित तपासण्यांवर पैसे खर्च केल्यानंतरच उपचारासाठी दाखल करून घेतले जात असल्याचाही प्रकार समोर आला अाहे. 
 

बातम्या आणखी आहेत...