राष्ट्रीय / दिल्ली वन विभागातून बेपत्ता झालेली 'लक्ष्मी' दोन महिन्यानंतर सापडली, पोलिसांनी महावताला घेतले ताब्यात

लक्ष्मीला हरियाणामधील यमुनानगरच्या संतूर वनात पाठवण्यात आले

दिव्य मराठी वेब

Sep 19,2019 05:15:00 PM IST

नवी दिल्ली- दिल्ली वन विभागने दोन महीन्यांपूर्वी बेपत्ता झालेली दिल्लीमधील एकुलती-एक हत्ती 'लक्ष्मी'ला दोन महिन्यानंतर शोधून काढले. अधिकाऱ्यांनी बुधवारी यमुना खादर परिसरातून लक्ष्मीला पकडले. ईस्ट डीसीपी जसमीत सिंग यांनी सांगितले की, 47 वर्षांची लक्ष्मी मागील दोन महिन्यांपासून बेपत्ता होती. तिला महावत सद्दाम तिला घेऊन पसार झाला होता. अनेक दिवस शोध घेऊनही त्याचा पत्ता लागत नव्हता. पण अखेर शेवटी पोलिसांनी लक्ष्मीला आणि सद्दामला ताब्यात घेतले.


लक्ष्मीला शोधण्यासाठी सर्च अभियान सुरू केले होते. वन विभागच्या टीममध्ये 12 अधिकारी होते. त्यांना संशय होता की, दिल्ली-यूपी बॉर्डरजवळ यमुना नदीजवळील परिसरात लक्ष्मीला ठेवले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या परिसरात आपला तपास वाढवला होता. त्यानंतर पक्की माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचुन अखेर लक्ष्मीला पकडले आणि तिला घेऊन जाणाऱ्या सद्दामला ताब्यात घेतले.

X
COMMENT