आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंसह नाराज भाजप आमदारांवर महाआघाडीचा डाेळा?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुजन नेत्यांना डावलले, असा आराेप करत एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे, राेहिणी खडसेंसारख्यांच्या पराभवात व बावनकुळे, तावडेंची तिकिटे कापण्यातही भाजपमधील लाेकांचा हात असल्याचा आरोप केला. आता प्रकाश शेंडगे व इतर ओबीसी नेतेही ही टीका करू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पूर्वाश्रमीचे भाजप नेते व आता शिवसेनेत प्रवेश केलेल्या शेंडगे यांच्यासह १० ते १२ ओबीसी नेत्यांनी गुरुवारी खडसेंची भेट घेतली व ‘ओबीसी नेत्यांनी एका छताखाली यावे,’ ही गळ घातली. त्यावरून खडसेंवर शिवसेना ‘गळ’ टाकत असल्याची चर्चा सुरू आहे. खडसे मात्र अजूनही भाजप साेडणार नसल्याच्या निर्णयावर ठाम आहेत. 

माजी आमदार शेंडगे म्हणाले, ‘भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर नेहमीच अन्याय होत आहे. हे थांबवण्यासाठी आम्ही खडसे यांची भेट घेतली आणि आता भाजपमधील अन्य नेत्यांचीही भेट घेणार आहोत. १५ दिवसांत पुन्हा एकदा बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल.’ खडसे पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या आल्यानंतर विनोद तावडे यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. तावडे यांनी पंकजा मुंडे यांचीही भेट घेतली होती आणि विशेष म्हणजे त्यानंतर खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. या सर्व भेटीगाठींमुळे भाजपचे १२ आमदार पक्ष सोडण्याच्या मन:स्थितीत असल्याचे सांगितले जात होते.

मेगाभरतीनंतर मेगाओहाेटी येणारच : बाळासाहेब थाेरात

‘काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आमिष दाखवून भाजपने मेगाभरती केली होती. सत्ता गेल्यानंतर ते आमदार स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत. जुन्या पक्षात परतावे असं त्यांचे मत आहे,’ असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री बाळासाहेब थाेरात म्हणाले, ‘जेवढी भरती मोठी तेवढी ओहोटी मोठी, हा निसर्गाचा नियम आहे, हे होणारच. महाआघाडीतच बंड, तरीही चाेराच्या उलट्या बाेंबा : आशिष शेलार


भाजपने आयात केलेल्या नेत्यांपैकी काही आमदार व दाेन खासदार महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी गुरुवारी केला. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते अॅड. आशिष शेलार म्हणाले, ‘भाजपचा एकही आमदार फुटणार नाही. आघाडीच्या आमदारांमध्येच अस्वस्थता असून ते बंड करण्याच्या तयारीत आहेत. या भीतीतून सत्ताधारी  अशा अफवा पसरवत आहेत. हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. भाजपचे मूळ किंवा आलेले आमदार पक्षशिस्त पाळणारे आहेत.

बातम्या आणखी आहेत...