आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- उत्कृष्ट नेतृत्व, धडाकेबाज फलंदाजी आणि जलद यष्टीरक्षण अशा गोष्टींचे मिलन असलेला खेळाडू म्हणजे महेंद्रसिंह धोनीचा आज वाढदीवस आहे. आज तो 38 वर्षांचा झाला आहे. धोनीने आपला 38 वा वाढदिवस पत्नी साक्षी, मुलगी झीवा आणि संघाच्या इतर खेळांडूंसोबत साजरा केला. तो सध्या लंडनमध्ये आहे, त्याने आपला वाढदिवस जोरदार पार्टी देऊन साजरा केला. त्याने आपल्या बर्थडे पार्टीचे काही फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्या फोटत केदार जाधव, हार्दिक पांड्या दिसत आहेत.
झारखंडमधील रांची शहरात 7 जुलै 1981 रोजी धोनीचा जन्म झाला. रांचीच्या DAV जवाहार विद्या मंदिर या शाळेत त्याचे शिक्षण पूर्ण झाले. लहानपणापासून धोनीचा अभ्यासापेक्षा खेळण्यातच जास्त रस होता. त्याची आई, बहिण आणि मित्र त्याला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे, पण वडील त्याच्या खेळण्याच्या विरोधात होते. क्रिकेटला आपले सर्वस्व बनवण्यापूर्वी धोनीला फुटबॉल आणि बॅटमिंटन खेळात जास्त रस होता. विशेष म्हणजे त्याने क्लब आणि जिल्हा पातळीवर फुटबॉल आणि बॅटमिंटनच्या स्पर्धा खेळल्या आहेत. धोनीच्या नावे 2007 मधील टी-20 विश्वचषक, 2011 मधील वन-डे विश्वचषक आणि त्यानंतर चॅम्पियन ट्रॉफीचे विजेतेपद हे सर्व विश्वकप धोनीच्या काळात टीम इंडियाला मिळाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.