आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वचषकानंतर धोनी घेणार निवृत्ती...? त्याचा खेळावर अनेकजण उपस्थित करत आहे प्रश्न

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क- क्रिकेट विश्वचषकातील शेवटचा सामना महेंद्र सिंह धोनीचा शेवटचा सामना असण्याची शक्यता आहे. एका न्यूज एजंसीच्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. भारताने मंगळवारी बांग्लादेशला 28 रनाने पराभूत करून उपांत्य फेरीत धडक मारली. जर भारताने सेमीफायनल आणि त्यानंतर फायनलमध्येही विजय मिळवला तर तो सामना धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सगल्यात लक्षा राहणारा शेवटचा सामना असेल.


पुढे खेळण्याची शक्यता कमी
नाव न सांगण्याच्या अटीवर एजंसीसोबत बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “तुम्ही धोनीबद्दल काही सांगू शकत नाहीत, पण असे वाटत नाही की, या विश्वचषकानंतर तो खेळेल. हेही लक्षात घ्यावे लागेल की, धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय अचानक घेतला होता. त्यामुळे तो काय आणि कधी करेल याचबाबत सांगता येत नाही.”


टी-20 वर्ल्ड कपवर नजर
एमएसके प्रसादच्या अध्यक्षतेत निवडसमितीचा कार्यकाळ ऑक्टोबरपर्यंत आहे. पुढील वर्षी टी-20 विश्वचषक ऑस्ट्रेलियात होत आहे. त्यामुळे असे मानले जात आहे की, या विश्वचषकानंतर पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकाची आणि संघात होणाऱ्या बदलाची तयारी लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे या नव्या समितीला खेळाडूंचे परिक्षण करण्यासाठी वेळ लागेल. पण धोनीच्या निवृत्तीची गोष्ट संवेदनशील आहे, त्यामुळे यावर कोणीच अधिकृतरित्या बोलण्यास तयार नाहीये. 


सचिन आणि सौरवने उपस्थित केले प्रश्न
विश्वचषकातील 7 सामन्यात धोनीने 93 च्या स्ट्राइक रेटने 223 रन बनवले आहेत. पण, स्ट्राइक रोटेट करने आणि मोठ्या शॉट खेळण्याच्या त्याच्या क्षमतेवर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीनेही धोनीच्या खेळावर नाराजी व्यक्त केली आहे. भारताच्या एका माजी खेळाडूने म्हटले, “टीम व्यवस्थापनाला 2017 च्या चँपियंस ट्रॉफीनंतर धोनीवर निर्णय घ्यायला हवा होता. पण, नंतर त्याला विश्वचषकापर्यंत खेळून देण्याचे ठरले. आता आपण सेमीफायनलमध्ये आलो आहोत. पण, साधारण कामगिरी केली तरीदेखील धोनीचा बचाव केला जात आहे. धोनीला कोणीच त्याच्या निवृत्तीबाबत विचारू शकत नाही. पण विश्वचषकानंतरचे दृष्य वेगळे असू शकते.” 

बातम्या आणखी आहेत...