आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताण व राग मलाही येतो, मात्र मी...; विश्वचषक उपांत्य फेरीनंतर प्रथमच बोलला धाेनी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - असे नाही की मला राग येत नाही, ताण येत नाही. या सर्व भावना मी अनुभवतो, मात्र मी त्यांच्यावर कसे नियंत्रण मिळवायचे हे जाणतो. मीही इतरांप्रमाणे आहे. जर माझ्या मनात-डोक्यात नकारात्मक विचार आल्यास ते लपवण्याला योग्य मानतो. कारण अशा प्रकारच्या विचारांमुळे आपल्याला काही मिळत नाही, असे भारताचा यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीने म्हटले. धोनीने बुधवारी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात निर्णय घेण्याच्या क्षमतेवर आपले मत मांडले.

तो म्हणाला, ‘मी मोठमोठ्या योजना तयार करण्यापासून वाचतो. कोणत्याही स्पर्धेच्या सुरुवातीलाच फायनलमध्ये जिंकण्याचा विचार केल्यास अडचण होते. पुढील सामना कसा खेळायचा याचा विचार हवा. आता आपण काय करायचे हवे, असे ठरवणे योग्य असेल. माझ्याबद्दल सांगतो कोणत्याही समस्येचा विचार करण्याऐवजी त्यावर समाधान शोधण्याचा विचार केल्यास माझे डोके अधिक चांगले चालते.’

विश्वचषकातील उपांत्य सामना गमावल्यानंतर धोनी प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाला. तो क्रिकेटसह सांघिक कामगिरीवरदेखील बोलला. ९० कसोटी, ३५० वनडे आणि ९८ टी-२० सामने खेळलेल्या धोनीने म्हटले की - आपण टीममधील एक-दोन खेळाडूंवर निर्भर राहून काही सामने जिंकू शकतो, मात्र सतत नाही. प्रत्येक खेळाडूने छोट्या छोट्या पद्धतीने, सतत चांगले योगदान दिल्यास सोपे होते. सामन्यात कोणत्या महत्त्वाच्या क्षणी खेळाडूने चांगला झेल घेतला, तर त्याचे ते योगदान महत्त्वाचे आहे.