आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःपेक्षा 3 वर्षांनी मोठ्या मराठमोळ्या नम्रताच्या प्रेमात पडला होता महेशबाबू, अशी आहे दोघांची Love Story

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साऊथ सुपरस्टार महेश बाबू आज त्याचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. 9 ऑगस्ट 1975 रोजी महेशबाबूचा जन्म चेन्नई येथे झाला. महेशबाबूने वयाच्या चौथ्या वर्षीच चित्रपटात डेब्यू केला होता. 1990 पर्यंत काही चित्रपटात काम केल्यानंतर त्याने कॉलेज पूर्ण करण्यासाठी ब्रेक घेतला होता. 1999 साली महेशबाबुने अभिनेता म्हणून 'राजा कुमारुदु' या चित्रपटातून डेब्यू केला. या चित्रपटात त्याची अभिनेत्री प्रिटी झिंटा होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर त्याने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले. 


मराठमोळ्या नम्रता शिरोडकरसोबत थाटले लग्न..
2005 साली महेश बाबूने मिस इंडिया आणि बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबत लग्न केले. दोघांची भेट 2000 साली वामसी चित्रपटादरम्यान झाली होती. पाच वर्षे डेटींग केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांना आता मुलगा गौतम कृष्णा आणि मुलगी सितारा आहे. आज महेशबाबूच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या लग्नाचा अल्बम खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.


पुढच्या स्लाईडवर पाहा, महेशबाबू आणि नम्रता शिरोडकरचा Wedding Album...

बातम्या आणखी आहेत...