आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलिया भट्टचे वडिल म्हणाले - \'शेजाऱ्यांवर प्रेम करा\' तर बॉलिवूडच्या एका प्रोड्यूसरने दिले सडेतोड उत्तर, सोशल मीडिया यूजर्सदेखील महेश भट्ट यांच्यावर भडकले 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आलिया भट्टचे वडील आणि फिल्ममेकर महेश भट्ट अशातच त्यांनी केलेल्या एका ट्वीटमुले चर्चेत आहेत. मात्र महेश भट्ट यांच्या या ट्वीटला बॉलिवूडच्याच एका डायरेक्टरने सडेतोड उत्तर दिले आहे. महेश भट्ट यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे - ''आपल्या शेजाऱ्यांना आपले समजा आणि त्यांच्यावर प्रेम करा.'' महेश भट्ट यांच्या या ट्वीटला बॉलिवूडचे प्रोड्यूसर अशोक पंडित यांनी कडक उत्तर दिले. 

काय म्हणाले अशोक पंडित...
कश्मीरच्या मुद्यांवर, विशेषतः कश्मीरी पंडितांसाठी लढणारे अशोक पंडित यांनी महेश भट्ट यांना प्रत्युत्तर दिले ते म्हणाले, ''सर आम्ही मागील अनेक वर्षांपासून असे करण्याचा प्रयत्न करत आहोत, पण बदल्यात आमच्या बहीण-मुलींवर बलात्कार आणि मृत्यू मिळत आहे. आमचे घर जबरदस्ती जाळले जाते आणि अनेकदा तर घर सोडायलाही लावले जाते. जेव्हा शेजारी दहशतवादी असतील आणि जर त्याने आपल्याला प्रत्येक पद्धतीने बरबाद करायचे ठरवलेच असेल तेव्हा अशा शेजाऱ्यांवर प्रेम कसे करायचे. मी औरंगजेबाला आलिंगन देऊ शकत नाही.'' महेश भट्ट यांना अशापद्धतीने उत्तर दिल्यानंतर अशोक पंडित यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

महेश भट्ट यांच्या ट्वीटमुळे ट्रोल करत आहेत लोक... 
महेश भट्ट यांच्या ट्वीटनंतर लोक त्यांना खूप ट्रोल करत आहेत. एका व्यक्तीने लिहिले, 'हो सर, आम्ही नेपाळ, भूटान, बांग्लादेश आणि म्यान्मार यांसारख्या शेजाऱ्यांवर प्रेम करतो. तसेच आणखी एकाने लिहिले, 'शेजारीदेखील प्रेम करण्यासारखा असला पाहिजे ना.' एक व्यक्ती तर महेश भट्ट यांना उद्देशून म्हणाला, 'आधी आपल्या देशावर प्रेम करा.' 

Love your neighbor as yourself. https://t.co/fGs0VqTI4b

— Mahesh Bhatt (@MaheshNBhatt) March 27, 2019

Sir We tried Our best to do that for years but then were raped, killed, burnt & forced to leave our homes. How can one love such neighbours who are terrorists & have decided to destroy us. ? Just being a neighbour dosent qualify to be loved. I cannot embrace an Aurangzeb. 🙏 https://t.co/YXJFfzlxSE

— Ashoke Pandit (@ashokepandit) March 27, 2019
बातम्या आणखी आहेत...