आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्कः महेश भट यांच्या आगामी 'जलेबी' या चित्रपटाचे पहिले पोस्ट रिलीज होताच सोशल मीडिया यूजर्सच्या निशाण्यावर आले आहे. ट्वीटरवर जलेबीच्या पोस्टरसोबत आणि एक फोटो शेअर केला जातोय. या ब्लॅक अँड व्हाइट फोटोत एक मुलगी ट्रेनच्या बाहेर आहे आणि एक सोल्जर (तिचा पती) तिला किस करतोय.
हे आहे फोटोचे सत्यः हा आयकॉनिक फोटो लॉस एंजिलिसमधील टाइम्सचे फोटोग्राफर फ्रँक ओ ब्रॉयन यांनी क्लिक केला होता. 1950 साली एक सैनिक कोरियन वॉरसाठी रवाना होत असताना हा फोटो क्लिक करण्यात आला होता. फोटोत सैनिक रॉबर्ट माये होते, ते त्यांची पत्नी ग्लोरियाला किस करत होते. रॉबर्ट 160 इन्फेन्ट्री रेजीमेंटमध्ये सोल्जर होते.
वरुण मित्राची डेब्यू फिल्म : फिल्ममध्ये रिया चक्रवर्ती असून तिच्या अपोझिट वरुण मित्रा आहे. जलेबी हा वरुणचा डेब्यू चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक पुष्पदीप भारद्वाज यांचाही हा पहिलाच चित्रपट आहे. प्रॉडक्शन मुकेश भट, महेश भट आणि विशेष फिल्मचे आहे. हा चित्रपट येत्या 12 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे.
टॉलिवूडमध्येही झाला होता याच पोजचा वापर...
अशाप्रकारचा आणखी एक प्रयोग टॉलिवूड चित्रपटात करण्यात आला होता. या फोटोत ट्रेनऐवजी बसच्या खिडकीचा वापर करण्यात आला होता. महेश भट यांच्या ट्विटर अकाउंटवर यूजर्नी हे दोन्ही फोटो अपलोड केले आहेत. काही यूजर्सनी लिहिले पोस्टर कॉपीचे आहेत, तर कथानकाची चोरी केलीच असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.