आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवकिसन सारडा यांना 'महेशभूषण' पुरस्कार; सात ऑक्टोबर रोजी धुळ्यात होणार वितरण \

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे संस्थापक अध्यक्ष देवकिसन सारडा यांना महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या वतीने देण्यात येणारा 'महेशभूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण ७ ऑक्टोबरला धुळ्यात हिरालालजी भराडियानगर, कान्हा रेसिडेन्सी, गुरुद्वाराजवळ येथे होणार आहे. याशिवाय सेठ सीतारामजी सुखदेवजी बिहाणी (बंगडीवाला) यांच्या स्मरणार्थ विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या पुरस्कारार्थींच्या नावांचीही घोषणा करण्यात आली आहे. 


त्यामध्ये डॉ. रामप्रसाद लखोटिया (लातूर, शासकीय सेवा), शिवरतन मुंदडा (जालना, सार्वजनिक सेवा), कीर्ती बंग (अहमदनगर, शिक्षण), सुभाषचंद्र सारडा (बीड, शिक्षण क्षेत्रात विशेष कार्य), श्रद्धा लढ्ढा (जळगाव, क्रीडा), बरखा बाहेती (अहमदनगर, कला), भरत मंत्री (जालना, कृषी), रमेशचंद्र लाहोटी (जळगाव, साहित्य), श्रीकिसन भुतडा (इचलकरंजी, उद्योग), डॉ. नीलेश चांडक (जळगाव ) यांचा समावेश आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमास सभेचे प्रदेशाध्यक्ष मधुसूदन गांधी हे अध्यक्ष, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, महासभा संघटनमंत्री अजय काबरा, उपसभापती अशोक बंग, संयुक्त मंत्री सतीश चरखा यांची उपस्थिती राहणार आहेत. सारडा यांच्या माहेश्वरी समाजाप्रति अहर्निश योगदानाची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...