आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

61st B'day: महेश कोठारेंचे हे RARE PHOTOS यापूर्वी नक्कीच कधी पाहिले नसतील तुम्ही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 61 वर्षे पूर्ण केली आहेत. 28 सप्टेंबर 1957 रोजी अभिनेते अंबर कोठारे यांच्या घरी महेश यांचा जन्म झाला. आईवडिलांकडून महेश यांना अभिनयाचे बाळकडू मिळाले आहे. महेश यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही दिग्दर्शक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवातच हिंदी सिनेसृष्टीपासून केली.

 

'छोटा जवान' या हिंदी चित्रपटात ते पहिल्यांदा बालकलाकाराच्या रुपात झळकले होते. त्यानंतर‘राजा और रंक’, ‘मेरे लाल’ या चित्रपटांमध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते. ‘शुभमंगल सावधान’, ‘झपाटलेला’, ‘धूमधडाका’, ‘माझा छकुला’, ‘झपाटलेला २’, ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटांसोबतच त्यांनी ‘मासूम’, ‘लो मैं आ गया’ आणि ‘खिलौना बना खलनायक’ या हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले.


आपल्या पन्नास वर्षांहून अधिकच्या करिअरमध्ये त्यांनी अनेक पुरस्कारांवर आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे. आता ते छोट्या पडद्यावर मालिकांच्या निर्मितीत व्यस्त आहेत. सध्या त्यांची 'विठू माऊली' ही मालिका छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आज महेश कोठारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही त्यांच्या चाहत्यांसाठी घेऊन आलो आहोत, त्यांच्या अतिशय जुन्या छायाचित्रांचा खजिना...

 

महेश कोठारे यांच्या बालपणीच्या छायाचित्रांपासून ते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतच्या निवांत क्षण, प्रसिद्ध लेखक सलीम खान, गायिका लता मंगेशकर यांच्या हस्ते त्यांना मिळालेल्या पुरस्कारांच्या छायाचित्रांचा समावेश यात आहे...

बातम्या आणखी आहेत...