आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: या कारणामुळे महेश कोठारेंना गमवावे लागले होते स्वतःचे घर, वाचा Unknown Facts

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


भारतीय सिनेसृष्टीतील अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांचा आज वाढदिवस. 28 सप्टेंबर 1957 रोजी जन्मलेले महेश कोठारे यांना घरातून अभिनयाचे बाळकडू मिळाले आहेत. त्यांचे वडील अंबर कोठारे हे प्रसिद्ध अभिनेते आहेत. तर आईसुद्धा या अभिनेत्री आहेत. महेश कोठारे यांनी ‘छोटा जवान’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. ‘राजा और रंक’, ‘मेरे लाल’ या चित्रपटांमध्ये ते बालकलाकाराच्या रुपात झळकले. ‘शुभमंगल सावधान’, ‘झपाटलेला’, ‘धूमधडाका’, ‘माझा छकुला’, ‘झपाटलेला 2’, ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटांसोबतच त्यांनी ‘मासूम’, ‘लो मैं आ गया’ आणि ‘खिलौना बना खलनायक’ या हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

 

मराठी चित्रपटसृष्टीचे आघाडीचे अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून त्यांच्या नावाची गणना होते. पण हे यश त्यांना सहजासहजी मिळालेल नाही. आईवडील दोघेही कलाक्षेत्रात असूनदेखील या क्षेत्रात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करायला त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागली.

 

आज महेश कोठारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला सांगतोय, त्यांच्या या संघर्षाविषयी...

 

वकील आहेत महेश कोठारे...
महेश कोठारे यांचे आईवडील दोघेही कलाक्षेत्रातील असल्याने ते चित्रपटांकडे वळले. छोटा जवान, राजा और रंक मधून लहानपणीच अभिनयाला त्यांनी यशस्वी सुरुवात केली होती. परंतु मोठेपणी हिरो म्हणून माझे चित्रपट एकापाठोपाठ आपटत गेले. अशा काळात वकिलीचे शिक्षण झाले असल्याने मी काही काळ वकिलीही केली; पण अपयशाने हार मानायची नाही, असा माझा स्वभावच होता, असे महेश कोठारे एका मुलाखतीत म्हणाले होते.

 

चित्रपट बनवण्यासाठी मित्राकडून उसणे घेतले होते पैसे... 
हीरो म्हणून फारसे यश मिळत नसल्याचे बघून महेश कोठारे यांनी स्वतः चित्रपट बनवायचे ठरवले. पण चित्रपट बनवण्यासाठी त्यांच्याकडे पैसेच नव्हते. म्हणून त्यांनी त्यांच्या एका मित्राकडून  20 हजार रुपये उसने घेऊन एका निर्मात्याकडून 'प्यार किये जा' या हिंदी चित्रपटाचे हक्क विकत घेतले आणि त्याचा मराठीत रिमेक बनवला. हा चित्रपट होता धूमधडाका. हा चित्रपट साकारल्यावर मराठी चित्रपटसृष्टीत एकच धूमधडाका उडाला आणि महेश कोठारे दिग्दर्शक म्हणून नावारुपास आले.

 

हिंदीत निर्माता म्हणून ठरले अपयशी... 

महेश कोठारे यांनी हिंदीत 'मासूम' हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट यशस्वी ठरल्यानंतर हिंदी चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 'लो मैं आ गया' या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या. पण दुर्दैवाने हा चित्रपट सणकून आपटला. या चित्रपटाच्या अपयशाने मी आर्थिकदृष्ट्या 20 वर्षे मागे गेलो. कर्जाची परतफेड, घरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना तारेवरची कसरत करावी लागली होती, असे महेश कोठारे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

 

नुकसानामुळे गमवावे लागले होते घर.. 
जुन्या आठवणींना उजाळा देताना महेश कोठारे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की हिंदी चित्रपटाच्या निर्मितीत खूप नुकसान सहन करावे लागले होते. एकवेळ अशी आली होती की, कोल्हापूरवरून चित्रपटाच्या शूटिंगवरून मुंबईला परतताना माझ्याजवळ स्वत:चे घरही उरले नव्हते. पछाडलेला, खबरदारच्या यशानंतर हळूहळू गाडी रुळावर आली.


पुढे वाचा, केवळ एक रुपया मानधनावर लक्ष्मीकांत यांनी साइन केला होता महेश कोठारेंचा चित्रपट.. 

बातम्या आणखी आहेत...