आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मुंबई सागा'मध्ये जॅकी श्रॉफ ऐवजी या मराठी कलाकाराची एंट्री, महाराष्ट्रीयन पुढाऱ्याची साकारणार भूमिका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क - 80-90 च्या दशकातील मुंबईच्या अंडरवर्ल्डचे चित्र दाखवणाऱ्या 'मुंबई सागा' चित्रपटात महेश मांजरेकरची एंट्री झाली आहे. संजय गुप्ताचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात जॅकी श्रॉफला भूमिका देण्याचा विचार करण्यात येत होता. मात्र जॅकीने तारखा नसल्यामुळे चित्रपट करण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे. महेश मांजरेकर 'मुंबई सागा'मध्ये एक महाराष्ट्रीयन राजकीय पुढाऱ्याची भूमिका निभावणार आहे. 
 
चित्रपटात महेश मांजरेकराच्या एंट्रीबाबत दिग्दर्शक संजय गुप्ताने सांगितले की, ''मला जॅकीसोबत काम करायचे होते. परंतु तारखांच्या अडचणीमुळे त्यांना हा चित्रपट सोडावा लागला. माझे आणि महेशचे 'कांटे' चित्रपटापासूनचे चांगले संबंध आहेत. आम्ही अनेक चित्रपटांत सोबत काम केले आहे. मी महेशला चित्रपटाबाबत सांगितले, तो काम करण्यास तयार झाला.''

चित्रपटाचे निर्माते भूषण कुमारने महेश मांजरेकरचे कौतुक करत सांगितले की, "महेश एक हाडाचा कलाकार आहे." मिळालेल्या माहितीनुसार महेश मांजरेकर पुढील आठवड्यात चित्रपटात काम करण्यास सुरुवात करतील. 'मुंबई सागा' पुढील वर्षी 19 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर शिवाय जॉन अब्राहम, इमरान हाशमी, सुनील शेट्टी, गुलशन ग्रोव्हर, प्रतिक बब्बर सह अनेक मोठे कलाकार दिसणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...