आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mahesh Manjrekar's Daughter Sai Turn 23 Today Celebrates Her Birthday With Salman Khan Sonakshi Sinha

महेश मांजरेकरांची लेक सई झाली 22 वर्षांची, सलमान-सोनाक्षीसोबत साजरा केला वाढदिवस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांची लाडकी लेक सई मांजरेकर हिने नुकतीच वयाची 22 वर्षे पूर्ण केली आहेत. सईसाठी यंदाचा वाढदिवस अतिशय खास आहे. कारण नुकताच तिचा पदार्पणातील दबंग 3 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला असून तिच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. 

सईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महेश मांजरेकरांनी एका बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते.  या पार्टीत सलमान खान, सोनाक्षी सिन्हा आणि अरबाज खान सहभागी झाले होते.  सईच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो  आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी एका व्हिडिओत सई सलमान खानसोबत डान्स करताना दिसत आहे.