आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 दिवसांनी महिंद्रा करणार नवीन कार लाँच, 2 व्हेरिएंटमध्ये 7 स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्ससह मिळतील हे भन्नाट फीचर्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने नवीन SUV ALTURAS G-4 ची बुकिंग सुरू केली असून ग्राहक आपल्या जवळच्या महिंद्रा शोरूममध्ये जाऊनदेखील बुकिंग करू शकतील. बुकिंगसाठी त्यांना 50 हजार रुपये रक्कम भरावी लागतील. कंपनी ही कार भारतामध्ये 24 नोव्हेंबर रोजी लॉन्च करणार आहे.

 

असे मानले जाते की, ALTURAS G-4 ही कार SSANG YOUNG REXTON SUV ची जागा घेईल. ही कार म्हणजे भारतातील कंपनीचे एक नवीन फ्लॅगशिप मॉडेलही असेल. कंपनीच्या सूत्रांनुसार, ही XUV 500 लाइन-अपची कार असेल. रेक्सटन कारच्या तुलनेत या कारमध्ये अनेक बदलदेखील जाणवतील. कंपनीने या कारच्या किमतीविषयी अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती प्रसारित केलेली नाही. या कारची एक्सटर्नल बाजू अत्यंत आकर्षक दिसते, तर आतील बाजूदेखील त्याहीपेक्षा आकर्षक असणार यात काही शंकाच नाही. माध्यमांच्या अहवालानुसार कंपनी कारचे नाव बदलून  XUV 700 असेदेखील ठेवू शकते.

 

ALTURAS असेच नाव का ठेवले?

महिंद्राने सर्व नवीन SUV गाड्यांना ALTURAS  म्हणून नामांकित केले आहे, कारण हिंदीमध्ये ALTURAS म्हणजेच 'उंची' असा त्याचा अर्थ आहे. निश्चितच नावाप्रमाणेच या कारच्या विक्रीने नवीन उंची गाठण्याचा महिंद्राचा प्रयत्न असणार आहे. भारतात या गाडीची तुलना टोयोटा फॉर्च्यूनर, फोर्ड एन्डेव्हर या गाड्यांशी केली जाऊ शकते.

 

ALTURS SUV ची वैशिष्ट्ये
> या SUV मध्ये  2.2-लीटरचे डिझेल इंजिन असून पॉवर 180.5 HP असेल. 450 NM टॉर्क त्याद्वारे जनरेट होईल.
> या कारमध्ये मर्सिडीझसारखा 7 स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्सदेखील असेल.
> ग्राउंड क्लिअरन्स 244 MM  असेल.
> कंपनी ही कार 2 WD आणि 4 WD या व्हेरिएंटमध्ये लाँच करेल.
> कारचे इंटेरिअर XUV 500 सारखे आहे. ते पूर्णपणे टचस्क्रीन स्वरूपात असेल.
> लेदर फिनिशिंग सीट, सन रुफ, संपूर्ण नियंत्रण असणारे स्टिअरिंग, ऑटो एसी, हवामान नियंत्रण यासारख्या वैशिष्ट्यांचा यात समावेश असेल.  

 

बातम्या आणखी आहेत...