आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिंद्राचा नफा 11 टक्क्यांनी कमी होऊन 1077 कोटी रुपयांवर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा (एमअँडएम)ला डिसेंबर तिमाहीमधील नफा ११.४४ टक्क्यांनी कमी होऊन १,०७६.८१ कोटी रुपयांवर आला आहे. २०१७ च्या समान तिमाहीमध्ये हा १,२१५.८९ कोटी रुपये होता. कंपनीने शुक्रवारी तिमाही निकाल जाहीर केला. त्यानुसार एमअँडएमचे एकूण उत्पन्न १५ टक्क्यांनी वाढून १३,४११.२९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. वर्षभरापूर्वीच्या समान तिमाहीमध्ये कंपनीचे उत्पन्न ११,६७६.०५ कोटी रुपय होते. कंपनीने डिसेंबर तिमाहीमध्ये १,३३,५०८ गाड्यांची विक्री केली आहे. वर्षभरापूर्वीच्या तुलनेमध्ये ही विक्री १० टक्के जास्त आहे.  


शहरी भागातील मागणी कमी झाल्याने सणांच्या हंगामातील विक्री अपेक्षेपेक्षा कमी राहिली असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. डॉलरच्या किमतीत होत असलेला चढ-उतार, इंधनाचे उच्चांकावर असलेले दर आणि शेअर बाजाराचे प्रदर्शन यामुळे मागणी कमी झाली होती. कंपनीने डिसेंबर तिमाहीमध्ये १३ टक्के जास्त ट्रॅक्टरची विक्री केली. हा आकडा ८७,०३६ नोंदवण्यात आला. २०१७ च्या समान तिमाहीमध्ये कंपनीने ७६,९४३ ट्रॅक्टरची विक्री केली होती. एमअँडएमने मागील तिमाहीच्या दरम्यान आठ टक्के जास्त गाड्यांची निर्यात केली. हा आकडा वाढून १२,३६३ वर पोहोचला आहे. २०१७ च्या डिसेंबर तिमाहीमध्ये कंपनीने ११,४२६ गाड्यांची निर्यात केली होती.  
 

१४ रोजी जेट संचालक मंडळाची सर्वसाधारण सभा  
संकटात असलेल्या जेट एअरवेजच्या संचालक मंडळाची १४ फेब्रुवारी रोजी बैठक होणार आहे. यामध्ये डिसेंबर तिमाही आणि चालू आर्थिक वर्षातील पहिल्या ९ महिन्यांच्या आर्थिक निकालाला मंजुरी देण्यात येणार आहे. कंपनीने शुक्रवारी ही माहिती दिली. गुरुवारी जेटने सांगितले की, भाडे भरले नसल्याने कंपनीची चार विमाने उभी आहेत. जेटला सलग तीन तिमाहीमध्ये ३,६५६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कंपनी ११ पैकी ९ वर्षे तोट्यात आहे. मागील १३ महिन्यांत जेट एअरवेजच्या शेअरमध्ये ७४ टक्क्यांची घसरण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...