आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिंद्रा भाड्याने देणार स्कॉर्पियो आणी मराझो, या शहरांमध्ये असेल स्कीम, भाडे महिन्याला 13 हजारांपासून सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील मोठी अॅटो कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने बुधवारी एक योजना जाहीर केली. त्यानुसार महिंद्राच्या गाड्या पाच वर्षांसाठी भाड्याने घेता येणार आहेत. महिंद्राकडून ज्या गाड्या वापरण्यासाठी भाड्याने दिल्या जाणार आहेत, त्यात मिड साइझ एसयूव्ही स्कार्पियो, मराझो, XUV500, KUV100 आणि TUV300 यांचा समावेश असेल. त्यांची एक्स शोरूम किंमत  10 ते 15 लाख रुपये आहे. पण कंपनी या गाड्या 13499 पासून 32999 च्या मासिक भाड्याने देणार आहे. कंपनीकडून विविध शहरांसाठी वेगवेगळे भाडे ठरवण्यात आले आहे. 
 
या शहरांत लागू होईल योजना 
महिंद्राची ही योजना सध्या फक्त दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, अहमदाबाद आणि पुण्यात लागू होईल. पण कंपनीच्या वतीने ही स्कीन देशातील 19 शहरांत लागू केली जाणार आहे, असे सांगण्यात आले आहे. कंपनीच्या या प्रयत्नामुळे बाजारात नवीन ग्राहक येतील असे कंपनीचे म्हणणे आहे. त्यासाठी कंपनीने Global leasing Service Firms Orix आणि  ALD Automotive शी करार केला आहे. 
 
पुढे वाचा, इंश्युरन्स, डॅमेज, सर्व जबाबदारी कंपनीची.. 
 
 
 

बातम्या आणखी आहेत...