आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Jawa नंतर महिंद्राचा नवा धमाका; आणखी दोन Bike करणार लॉन्च, अधिक मायलेजसह क्रूझ बाइकची मज्जा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो डेस्क -  महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने दशकांपूर्वी हद्दपार झालेली जावा मोटारसायकल पुन्हा एकदा रस्त्यावर उतरवले. गेल्या आठवड्यात जावा मोटारसायकल लॉन्च केले आहे. एवढेच नव्हे, तर कंपनी Jawa नंतर आता क्लासिक लेजंड्स Yezdi आणि BSA च्या लॉन्चिंगची तयारी करत आहे. 

 

महिंद्रा टू-व्हीलर्सने बाइकच्या निर्मिती आणि विक्रीचे अधिकार BSA कडून खरेदी केले आहे. यापूर्वी महिंद्रा टू-व्हीलर्सने क्लासिक लेजंड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून Jawa लॉन्च करण्यासाठी Jawa मोटारसायकलसोबत करार केला होता. Yezdi 2019 वर्षाखेरीज लॉन्च करण्यात येईल. Yezdi बाइक Jawa बाइकपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.  BSA आणि Yezdi या 80-90 च्या दशकातील भारतातील टॉप बाइक होत्या. रोडकिंग म्हणून Yezdi ची ओळख होती. 

तज्ञांच्या मते, BSA बाइक Yezdi लॉन्च होण्यापूर्वीच बाजारात येऊ शकते. BSA बाइकमध्ये 500 अथवा 700 सीसी इंजिन मिळणार आहे. 


Yezdi ची वैशिष्ट्ये

तज्ञांच्या मते, नवी Yezdi मध्ये नवीन आणि कमी डिस्प्लेसमेंटचे इंजिन असणार आहे. चांगल्या मायलेजसाठी बाइकचे वजन देखील जुन्या बाइकपेक्षा कमी ठेवण्यात येणार आहे. 

जुन्या Yezdi बद्दल सांगायचे झाल्यास त्यामध्ये 250cc टू-स्ट्रोक एअर कूल्ड इंजिन होते. तसेच 13 bhp 20.5 Nm टॉर्क निर्माण करण्याची क्षमता होती.  नवीन Yezdi मध्ये Jawa चे 293cc इंजिन देण्याची शक्यता आहे. 70 च्या दशकात  Yezdi चे ऑईल किंग नामक नवीन मॉडेल लॉन्च करण्यात आले होते. यामध्ये पेट्रोलसोबत टू-टी ऑईल मिक्स केले जात होते. परंतु, फ्यूल पंपच्या दोषामुळे कंपनीने प्रोडेक्शन बंद केले होते. दरम्यान, क्लासिक लेजंड्स जावाचे 2 मॉडेल लॉन्च करण्यात आले आहेत. एका मॉडेलची किंमत 1,64,000 आणि जावा 42 ची किंमत 1,55,000 रूपये असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...