आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिंद्राने लाँच केला देशातील पहिला असा ऑटो, जो पेट्रोल आणि डिझेल शिवाय चालेल, कमी किमतीसोबत देतो 130KM मायलेज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो डेस्क - महिंद्रा अँड महिंद्राने देशातील पहिला इलेक्ट्रिक ऑटो लाँच केला आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या ऑटोला कंपनीने ट्रियो असे नाव दिले आहे. सोबतच याचे आणखी एक मॉडेल लाँच केले आहे. ऑटोची बेंगलुरु एक्स-शोरूम किंमत 1.36 लाख रूपयांपर्यंत ठरविण्यात आली आहे. कंपनीने या ऑटोची संकल्पना यावर्षीच्या ऑटो एक्सपो मध्ये मांडली होती.

 

कमी चार्जिंगमध्ये दमदार मायलेज
कंपनीने दावा केला आहे की, या ऑटोला फक्त 3.50 तासात पूर्णपणे चार्ज केल्यावर 130KM पर्यंत मायलेज देतो. तर 2.50 तास चार्जिंग केल्यावर 85 किलोमीटर मायलेज देईल. पेट्रोलच्या बाबतीत तुलना केली तर या ऑटोला 1KM साठी फक्त 50 पैसे खर्च येणार आहे.

 

5 वर्षे चालणार बॅटरी 
ऑटोमध्ये लिथीयम आयन बॅटरीचा उपयोग केला आहे. यातील बॅटरी मेंटनंस फ्री आहे आणि या ऑटोची देखरेख अगदी सोपी आहे. कंपनीने सांगितले की, बॅटरीचे आयुष्य  5 वर्षांची आहे. म्हणेजेच कोणत्याही अडचणीशिवाय 5 वर्षांपर्यंत बॅटरी वापरू शकतो. हा ऑटो पूर्णपणे प्रदुषण पुरक आहे.  

 

व्यवसायासाठी आहे चांगला प्रर्याय
आपल्याला व्यवसाय सुरू करण्यालाठी हा ऑटो एक उत्तम पर्याय होऊ शकतो. याची किंमत 1.36 लाखांपासून सुरू होते तर पेट्रोल ऑटो 1.50 लाखांपर्यंत येतो. अशातच कमी किमतीत या ऑटोद्वारे शहरामध्ये तुमचा व्यवसाय सुरू करू शकता.

बातम्या आणखी आहेत...